आजारपणाला कंटाळून इसमाची रेल्वेखाली आत्महत्या

रविराज शिंदे

दीर्घ आजाराने त्रस्त झालेल्या पवईतील एका ५० वर्षीय इसमाने कांजूरमार्ग रेल्वे स्थानक येथे लोकल खाली उडी घेवून, आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे घडली.

आद्याप्रसाद यादव असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव असून, ते पवईतील महात्मा फुले नगर येथे आपल्या परिवारासोबत राहत. तीन मुले आणि बायको सोबत राहणारे यादव काही महिन्यांपासून आजाराने त्रस्त असल्याची माहिती त्यांच्या परिवाराने पोलिसांना दिलेल्या जवाबात दिली आहे.

यादव रविवारी पहाटे नेहमी प्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाले, मात्र कांजुरमार्ग स्टेशनला पोहचल्यावर चालत्या लोकल खाली उडी घेवून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

घटनेची माहिती मिळताच आरपीएफ पोलिसांनी तत्काळ त्यांना राजावाडी रूग्णालयात दाखल केले, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आरपीएफ पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes