आयआयटी पवईची विदयुत कार ईवो ४, ‘फॉम्युला स्टुडंट’ स्पर्धेसाठी सज्ज

IMG_6779९ ते १२ जुलै या कालावधीत इंग्लंडमधील सिल्वरस्टोन सर्किटवर ‘फॉम्युला स्टुडंट’ स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. जागतिक स्तरावरील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेत, जगभरातील १०० पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये सहभाग घेणार आहेत. गेली चार वर्ष ह्या स्पर्धेत सहभाग घेणारी आयआयटी मुंबईची रेसिंग टिम, ह्या वर्षी आपल्या वेगवान इलेक्ट्रिक कार ईवो 4 सह मैदानात उतरत आहे. शनिवारी आयआयटी मुंबईच्या पी.आर. सक्सेना सभागृहात ७५ विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या या रेसिंग कारचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. ह्या वेळी दिलेल्या प्रात्यक्षिकानंतर सर्वांनी कारची आणि बनवणाऱ्या विद्यार्थ्यांची भरभरून प्रशंसा केली, कार स्पर्धेत आपली छाप नक्की पडेल असा विश्वास दर्शवला.

सिल्वरस्टोन सर्किटवर भरवण्यात येणारी ‘फॉम्युला स्टुडंट’ ही स्पर्धा, अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानाची आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी संधी मानली जाते. २००८ पासून आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून अश्या स्पर्धेसाठी रेसिंग कार बनवायला सुरवात झाली होती. सुरवातीला एस.ए.ई कार बनवणाऱ्या समुहाने गेल्या चार वर्षापासून विद्युत कार बनवायला सुरवात केली आहे. वर्षानुवर्ष त्यांची कार पुढच्या स्थरावर जात आहे. ह्या वर्षी सुद्धा ईवो 4 च्या रुपात समूह अधिक प्रभावशाली कार घेवून मैदानात उतरत आहे.

IMG_6743कारला हलके ठेवण्यासाठी, कारची बॉडी हलक्या पण मजबूत अशा अ‍ॅल्युमिनियम हनीकॉम्बने बनवण्यात आली असून, हलक्या वजनाचे कार्बन फायबर सस्पेन्शन, हायब्रीड प्लॅनेटरी गिअर बॉक्स यामुळे ही कार ० ते १०० किमी प्रतितास इतका वेग फक्त ३.५ सेकंदांत धारण करते.

३८९ व्होल्टेज बॅटरी क्षमता असलेल्या कारमध्ये सूरक्षिततेच्या दृष्टीने ड्रायव्हर सुट, फायरवॉल, थर्मल टेप सारख्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. शंभराहून अधिक स्पर्धक भाग घेणाऱ्या ‘फॉम्युला स्टुडंट’ स्पर्धेत, सर्वांमध्ये ईवो ४ ही अत्याधुनिक, १५ सेफ्टी सेंसरने सज्ज कार आपली छाप पाडेल, असा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes