घाटकोपर-हिरानंदानी जोडरस्त्याची गणेशोत्सवापूर्वी डागडूजी

g-h link rdवादाच्या भोवऱ्यात अडकलेला घाटकोपर-हिरानंदानी जोडरस्त्यावरील खड्यांना भरण्याचे काम या गणेश उत्सवापूर्वी करून, पवईकरांचा गणेशोत्सव तरी खड्डेमुक्त करण्याचे काम यावेळी पालिका एस विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी हाती घेतले आहे. याबाबत आवर्तन पवईकडून होत असलेल्या पाठपुराव्याला उत्तर देताना त्यांनी घाटकोपर-हिरानंदानी जोडरस्त्याचे काम सुरु करत असल्याबाबत एसएमएस करून कळवले आहे.

पवई परिसरात अनेक कंपन्यांनी आपली प्रमुख कार्यालये थाटली असल्याने हजारोंच्या संख्येने मुंबईकर या भागात येत असतात. पवई भागात राहणारे अनेक नागरिक सुद्धा आसपासच्या परिसरात कामानिमित्त जात असतात. पवईला लागून असणारे घाटकोपर, विक्रोळी या परिसरात येणाऱ्याजाणाऱ्या लोकांसाठी कैलाश कॉम्प्लेक्स मार्गे जाणारा घाटकोपर-हिरानंदानी जोडरस्ता हा सर्वात जवळचा आणि सोईस्कर रोड आहे; परंतु हिरानंदानी अक्षरधाम मंदिर ते पार्कसाईट या भागात रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्याची चाळण  झालेली आहे. मुंबईकरांना दररोज जम्पिंग-झपाक करत या खड्यांमधून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. अनेक गाड्या खड्यात अडकून गाड्यांचे भाग तुटून गाड्या खराब होण्याच्या घटना सुद्धा या रस्त्यावर घडत आहेत.

या रस्ताचे दुरुस्तीचे काम स्थानिक नेत्यांकडून बऱ्याच वेळा करण्यात आले आहे; परंतु परिस्थिती जैसे थी आहे. मुळात ज्या भागातातून हा रस्ता जातो तो भाग ट्रस्टच्या मालकीचा असून, मालकी हक्काला घेऊन कोर्टात वाद असल्याने या भागात रस्ता बनवण्यास प्रशासनाला अडचणी येत आहेत, परंतु लवकरच हा वाद मिटवून रस्त्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.

या संदर्भात आवर्तन पवईतर्फे पालिका ‘एस’ विभागाकडे होत असलेल्या सतत पाठपुराव्यास उत्तर देताना, स्वतः महानगरपालिका ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीना गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील खड्डे मुजवणे आणि डागडूजीचे काम करत असल्याचे एसएमएस करून कळविले आहे. येत्या काही दिवसात या रस्त्याच्या निर्मितीत असणारी समस्या दूर करून या रस्त्याचे निर्मितीचे काम करून घेणार असल्याबाबत सुद्धा त्यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!