चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीवर चाकूने हल्ला

hatyaआपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून, पवईच्या फुलेनगर परिसरात पतीने दारूच्या नशेत, आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. जखमी विवाहितेचे नाव सविता खरात (२७) असून, तिला सायन रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्यावर तिथे उपचार सुरु आहेत. ह्या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून, आरोपी पती संदिप खरातला अटक केली आहे.

पवईच्या फुलेनगर परिसरात संदीप खरात, आपली पत्नी सविता आणि परिवारासोबत राहतो. गेली ८ ते ९ महिने, त्या दोघांच्यात सविताचे परिसरातील दुसऱ्या तरुणाशी संबंध असल्याच्या संशयावरून सतत वाद होत असत. सोमवारी सकाळीही दोघांच्यात असाच वाद झाला होता. त्या रागाच्या भरात संदीप घरातून बाहेर पडला. दुपारी १ वाजताच्या सुमारास दारूच्या नशेत तो परतल्यावर पुन्हा दोघांच्यात वादाला सुरवात झाली आणि रागाच्या भरातच संदिपने चाकूने सवितावर सपासप वार केले. आरडाओरड ऐकून आलेल्या स्थानिकांनी जखमी अवस्थेत पडलेल्या सविताला पाहून पोलीसांना घटनेची सूचना दिली.

जखमी सविताला सायन रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर तिथे उपचार सुरु आहेत. स्थानिक आणि सविताच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी संदीपला अटक केली असून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes