जागतिक महिलादिन विशेष: पवईकर तरुणीची जनजागृतीसाठी इंडिया गेट ते वाघा बॉर्डर सायकलिंग

मानसिक तणाव आणि उदासीनता याच्याशी दोन हात करण्यासाठी ‘खेळाला जवळ करा’ असा संदेश घेऊन पवईकर आणि दोन मुलांची आई असणाऱ्या दिशा श्रीवास्तव (३६), यांनी इंडिया गेट ते वाघा बॉर्डर असा ६०० किलोमीटरचा प्रवास ४ मार्च ते ६ मार्च सायकलवरून करत लोकांच्यात जनजागृती केली.

कुरुक्षेत्र, लुधियाना आणि अमृतसर अशा तीन टप्प्यात त्यांचा हा प्रवास झाला. दररोज १७० किलोमीटर प्रवास करतानाचा ‘वोल्क अंड टोक’ करत दिशा यांनी आपली ही जनजागृती मोहीम राबवली.

घरसंसार आणि आपल्या आसपास असणाऱ्या सर्व लोकांची काळजी घेता घेता ‘स्त्री’ आपल्या स्वतःला एवढी विसरून जाते कि तिला तिचे स्वतःचे भानच उरत नाही. अशात मानसिक तणाव, आजार, उदासीनता याच्या विळख्यात ती कधी अडकून पडते हे तिचे तिलाच कळत नाही. याचा परिणाम अखेर जीवन संपवण्याने झाला असल्याची अनेक उदाहरणे समाजात आहेत.

दिशा श्रीवास्तव ही सुद्धा अशीच एक महिला जी अति तणावात जगत होती. मात्र त्यावर मात करत खेळाच्या माध्यमातून तिने जीवनात पुन्हा उभारी घेतली आणि आज ती लोकांना मानसिक तणाव आणि उदासीनता यांच्याशी लढण्यासाठी ‘खेळाला जवळ करा’ असा संदेश सायकलिंगच्या माध्यमातून देत आहे.

“पतीची साथ मिळत असतानासुद्धा मी मानसिक तणावाच्या गर्तेत अडकली होती. मी सुरुवातीला धावणे आणि नंतर सायकलिंगला आपली आवड बनवले आणि त्या गर्ततेतून अगदी सहज बाहेर पडले” असे दिशा याबाबत सांगते.

आपल्या इंडिया गेट ते वाघा या जनजागृती मोहिमेला शनिवारी ४ मार्चला इंडिया गेट येथून सुरुवात करत ८ तास ४६ मिनिटात १७०.१ किलोमीटर प्रवास करत त्यांनी कुरुक्षेत्र येथे पहिला विसावा घेतला. दुसऱ्या दिवशी ७ तास ०४ मिनिटात १२२.४ किलोमीटर अंतर पार करत त्यांनी लुधियाना येथे आपला विसावा घेतला. तर तिसऱ्या दिवशी १३१.३ किलोमीटर अंतर पार करत (अट्टारी) वाघा येथे त्यांच्या या जनजागृती मोहिमेची सांगता झाली.

सकाळी ४.३० वाजता आपल्या दिनचर्याची सुरुवात करणाऱ्या दिशा सायकलिस्ट असण्या व्यतिरिक्त, एक उत्तम धावपटू आहेत. अनेक मारथोन म्यारेथोन त्यांनी सहभाग नोंदवला आहे. सोबतच एक उत्तम नृत्यांगना आणि ट्रेकर सुद्धा आहेत. दररोज मुले उठण्यापूर्वी सायकलिंग करून घरी परतणाऱ्या दिशा रविवारी मात्र बराच वेळ मुंबईच्या विविध रस्त्यांवरून सायकलिंगचा आनंद घेताना आपणास आढळून येतील.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes