दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे चांदिवली तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक (वार्ड  १५०) शरद पवार आणि मनसे चांदिवली विभाग अध्यक्ष व नगरसेवक ईश्वर तायडे (वार्ड क्रमांक १५१) यांचा शिवसेनेत प्रवेश

pawar tayde shivsenaमुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदिवलीत आज (शुक्रवारी) एक मोठा बदल घडला असून, माजी नगरसेवक (वार्ड क्रमांक १५०) व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चांदिवली तालुका अध्यक्ष शरद पवार आणि मनसे चांदिवली विभाग अध्यक्ष व नगरसेवक ईश्वर तायडे (वार्ड क्रमांक १५१) यांनी शिवसेना विभागप्रमुख आमदार संजय भाई पोतणीस यांच्या मार्गदर्शनामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या दोघांच्या शिवसेनेत झालेल्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात मात्र एकच खळबळ माजली आहे.

घराघरात पोहचलेल्या शिवसेनेमुळे एकेकाळी शिवसेनेचा गड असणाऱ्या पवई आणि चांदिवली भागात पक्षाचे मजबुतीकरण झाले असून, २०१७ मध्ये येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी आता शिवसेना पूर्ण सज्ज आहे. या भागांमध्ये इतर पक्षात असणाऱ्या आणि काम करू इच्छिणाऱ्या अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांनी आधीच भगवा झेंडा खांद्यावर घेतला आहे. याच प्रवाहात शामिल होत, पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे चांदिवली तालुका अध्यक्ष शरद पवार व नगरसेवक ईश्वर तायडे यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला.

शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच पक्षाचे काम पाहत होते. चांदिवली वार्ड क्रमांक १५० मधून दोन वेळा नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून आले आहेत. स्थानिक पातळीवर जनतेचे काम करताना राष्ट्रवादी पक्षाला तालुक्यातच नव्हे तर मुंबईत मजबूत करण्याच्या कामात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

ईश्वर तायडे हे मनसेच्या हातावर मोजण्याइतपत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एक आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत बोरीवली राष्ट्रीय उद्यान भागातून चांदिवली येथील संघर्षनगरमध्ये पुनर्वसन करण्यात आलेल्या परिवारांच्या आणि परिसरातील अनेक समस्या सोडवण्यात ईश्वर तायडे यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. परिसरातील मुलाच्या बारशापासून लग्नापर्यंत कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावत असल्याने ते या परिसरातील घराघरात पोहचलेले आहेत. ज्यामुळे ते या भागाचे लाडके नगरसेवक म्हणून ही ओळखले जातात.

या दोघांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे शिवसेना मजबूत झालेली असतानाच राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ माजलेली आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!