पत्नीची गळा चिरून हत्या, आरोपी पतीस दोन तासात अटक

त्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीने तिची गळा चिरून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री अंधेरी पूर्व येथील गुंदवली गावठाण भागात घडली. जेव्हीएलआर येथे लपून बसलेल्या आरोपी पतीस अंधेरी पोलिसांनी दोन तासात अटक करत बेड्या ठोकल्या आहेत.

पत्नीच्या बाहेरख्यालीपणामुळे आरोपी पती व पत्नीचे एकमेकांसोबत सतत भांडणे होत असत. या सततच्या भांडणाला कंटाळून आरोपीने निर्मनुष्य अंधाऱ्या गल्लीत नेऊन पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.

अंधेरी पोलीसांना याबाबत माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश प्रधान, पोलीस उपायुक्त परिमंडळ १० नवीनचंद्र रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सात स्वतंत्र पथके तयार करून आरोपीचा शोध सुरु करण्यात आला. तांत्रिक पुराव्याच्या आधारावर दोन तासातच पोलिसांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड परिसरात लपून बसलेल्या आरोपी पतीस अटक केली.

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस निरीक्षक सहाणे, पोलीस निरीक्षक पडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पिसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरोशे, पोलीस फौजदार यशवंत पाटील, पोलीस फौजदार अनिल गायकवाड, पोलीस फौजदार बोराटे, फौजदार घाडगे, फौजदार सलीम शेख, फौजदार ढवन, पोलीस हवालदार संखे, हळदे, बाबर यांनी अथक परिश्रम घेत जलद गतीने तपास केला.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes