पवईत झाड कोसळण्याचे सत्र सुरूच

रविराज शिंदे/ रमेश कांबळे

पावसामुळे शाळा बंद असल्याने अनर्थ टळला

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई सहीत अनेक पूर्व उपनगरात झाडे कोसळण्याचे सत्र मागील दोन आठवड्यापासुन सुरू आहे. मात्र पूर्व उपनगरातील पवई मध्ये मागील काही दिवसापासून झाडे कोसळण्याच्या घटनांना उधाण आले आहे. आयआयटी पवई येथील पद्मावती रोडवर, पद्मालय मेटरनिटी होमजवळ एक भले मोठे झाड येथे उभ्या असणाऱ्या रिक्षा आणि मोटारसायकलवर पडल्याची घटना ताजी असतानाच, पवईत पुन्हा मंगळवारी मुसळधार पावसाच्या संततधारेत भले मोठे झाड कोसळले असून पवईतील मुक्तेश्वर आश्रम रोड येथे ही घटना घडली आहे. सदर मुक्तेश्वर आश्रम रोड येथे उर्दू शाळा असून या रस्त्यावर विद्यार्थांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते,. मात्र मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी होती, त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. अग्निशमन दल, महानगरपालिका घटनास्थळी दाखल होवून सदर झाड हटवण्यात आले आहे.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes