पवईत सायकल चोराला अटक, महागड्या सायकली हस्तगत

वईसह साकीनाका, मरोळ, एमआयडीसी भागात सायकल चोरून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत चोराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काल अटक केली आहे. मोहमद आरिफ अन्सारी (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून जवळपास १७ महागड्या सायकली सुद्धा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

पवईसह साकीनाका, मरोळ, एमआयडीसी भागात गेल्या काही महिन्यात सायकल चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला होता. वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांचा तपास करत असतानाच, वाढत्या सायकल चोरीच्या घटनांना लक्षात घेता मुंबई पोलिसांना सायकल चोरांना पकडण्याची जबाबदारी सुद्धा आली होती.

पवई पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या मुक्ताई अपार्टमेंटजवळून एक महागडी सायकल काही दिवसापूर्वी चोरीला गेल्याची तक्रार नोंद झाली होती. एक तरुण सायकल चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज यावेळी पवई पोलिसांच्या हाती लागले होते. ज्याच्या आधारावर गुन्हेप्रकटीकरण पथक तपास करत होते.

‘आमच्या खबऱ्याकडून आम्हाला साकीनाका भागात राहणारा एक तरुण सायकल चोरी करून नाममात्र भावात त्या विकत असल्याची माहिती मिळाली होती. ज्याच्या आधारावर आम्ही त्याच्यावर पाळत ठेवून, संशयास्पद रित्या वावरत असताना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

‘अन्सारी परिसरात फेरफटका मारताना इमारतीत ठेवलेली आणि सहजासहजी चोरी करता येईल अशा सायकल हेरून ठेवत असे. इमारतीच्या गेटवर असणारा सुरक्षारक्षक राउंड मारायला गेला की तो सायकल घेवून पसार होत असे.

पवई पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात ४ गुन्ह्यांची नोंद असून, साकीनाका, एमआयडीसी, जेबीनगर आणि मरोळ भागातून सुद्धा त्याने सायकल चोरी केल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

चोरी केलेल्या जास्तीत जास्त सायकली त्याने मरोळ भागातील चिम्मटपाडा येथे आपल्या काही ओळखीच्या लोकांना आणि मित्रांना नाममात्र किमतीत विकल्या आहेत.

अन्सारीकडून पोलिसांनी आत्तापर्यंत १७ महागड्या सायकली हस्तगत केल्या असून, त्याची बाजार किमत दीड लाखापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्याकडून अजूनही काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक विनोद लाडसह पोलीस हवालदार कुंभार, पोलीस नाईक देसाई, जगताप, पोलीस शिपाई बांदकर यांच्या पथकाने काम केले.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!