“राष्ट्र संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान” अंतर्गत पवई तलाव समितीने केली तलावाची साफसफाई

मुंबईतील पर्यटनाचा एक अविभाज्य भाग असणाऱ्या आणि मुंबईकरांचे आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या पवई तलावावर “राष्ट्र संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत ‘पवई तलाव समिती’च्यावतीने रविवारी साफसफाईचे काम करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पवईकरांनी यात सहभाग नोंदवला.

पाठीमागील काही वर्षात पवई तलाव भागात वाढणाऱ्या लोकसंख्यामुळे अतिक्रमण निर्माण झाले आहे. सोबतच परिसरात असणाऱ्या रहिवाशी आणि औद्योगिक वसाहतीतील घाण पाणी सुद्धा तलावामध्ये सोडले जात आहे. वाढलेला गाळ, शेवाळ, हिरव्या वणस्पती यांनी त्याच्या प्रदूषणात आणखीणच भर टाकली आहे. ज्यामुळे पवई तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे; त्याला वाचविण्यासाठी ना महानगरपालिका, ना-ही महाराष्ट्र शासन ठोस पाऊल उचलत आहे. जे पाहता आपला परिसर, नैसर्गिक देणगी रुपी मिळालेला आपला पवई तलाव आणि परिसर स्वच्छ रहावा यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पवई तलाव समितीतर्फे परिसर स्वच्छतेचे अभियान प्रकाश (बाबा) बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

तलावाच्या भागात असणारा कचरा आणि तलाव किनाऱ्यावर वाढलेल्या जलपर्णीना काढण्याचे काम यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित पवईकरांनी केले. जवळपास ५० किलो कचरा यावेळी तलाव भागातून बाहेर काढण्यात आला.

एवढ्यावरच न थांबता आपले निसर्गसौंदर्य वाचवण्यासाठी आणखी काही उपक्रम राबविण्याचा निर्धार सुद्धा यावेळी संस्थेतर्फे करण्यात आला.

, , , , , ,

One Response to “राष्ट्र संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान” अंतर्गत पवई तलाव समितीने केली तलावाची साफसफाई

  1. Dilip mishra May 13, 2019 at 6:18 pm #

    Jab tak drainage nahi band kiya jayega tab tak koi bhi fayda nahi hoga

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes