पवई तलावात उडी मारून तरूणीची आत्महत्या

रविराज शिंदे, रमेश कांबळे

पवईतील रमाबाई आंबेडकरनगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय तरूणीने पवई तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी ३ वाजता उघडीस आली आहे. ऐश्वर्या खंडागळे असे तरूणीची नाव असून, ती ज्ञान मंदिर शाळेत १० वीत शिकत होती.

शुक्रवारी कोचिंग क्लासला जात आहे असे सांगून गेलेली एश्वर्या उशिरा पर्यंत घरी परतलीच नाही. घरातील मंडळींनी रात्रभर ऐश्वर्याचा तिच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. अखेर घरच्यांनी पवई पोलिस ठाणेत हरवल्याची तक्रार दाखल केली.

शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास काही लोकांना एका तरुणीचा मृतदेह पवई तलावात तरंगताना आढळून आला. त्याला बाहेर काढला असता ऐश्वर्याच्या घरच्यांनी तो मृतदेह तिचाच असल्याची ओळख केली.

“ऐश्वर्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे कळू शकले नाही. तिच्यावर अभ्यासाचा दबाव होता का? प्रेमप्रकरणातून तर तिने आत्महत्या केली नाही ना? अशा प्रत्येक शक्यतेचा आम्ही तपास करत आहोत.” असे याबाबत बोलताना पवई पोलिस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes