जाहिरातीसाठी : ८८७९३१००७४, वृत्तसंपादक : ९८१९६१३९७४

Conman

ऑनलाईन गाड्या विकणाऱ्या साईटवर फसवणूक करणाऱ्यास अटक

ऑनलाईन गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटवर गाडी विक्री करणाऱ्या व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने पवई येथून अटक केली आहे. मोहम्मद अय्याज सय्यद (२८) असे त्याचे नवा असून, त्याच्या अटकेमुळे २०१८ पासून अद्यापपर्यंत मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेले अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. गाडी विक्री करणाऱ्या मालकाशी संपर्क साधून त्याला न वटणारा […]

Continue Reading 0
DSCN0221

पवई तलावाचा जलक्रीडा प्रस्ताव गुंडाळला

या तलावात निर्माण झालेल्या प्रदूषणापासून तलावाला वाचवण्यासाठी, पुनर्विकास करण्यासाठी आणि त्यास संरक्षित करण्यासाठी अनेक योजनांवर काम केले जात आहे. तलावात समृद्ध जैव विविधता आणि मगरीच्या दुर्मिळ प्रजाती आहेत. पवई तलाव भागाचे सुशोभिकरण केल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. पवई तलावात स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंग सारख्या जलक्रीडा सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तसा ठरावही […]

Continue Reading 0
pks with students

पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखले जाते. महाभारत, पुराणे ज्यांनी लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा मंगलदिन म्हणजे गुरुपौर्णिमा. याला व्यासपौर्णिमा असे सुद्धा संबोधले जाते. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. देशभर हा दिवस आपल्या गुरूला स्मरून त्यांच्या आदरार्थ साजरा केला जातो. मुलांनो आपल्या जीवनातील गुरुचे महत्व जाणा, असे […]

Continue Reading 0
bull attack iit powai

आयआयटी पवईतील विद्यार्थी बैलाच्या धडकेत जखमी

दोन बैलांच्या झुंजीत विद्यार्थ्याला उडवल्याची घटना पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये घडली. या घटनेमध्ये तरुण जखमी झाला आहे. पवईतील आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याला झुंज करणाऱ्या बैलानी धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. जखमी विद्यार्थ्याचे नाव अक्षय लथा असर असे आहे. त्याच्यावर विक्रोळी येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात […]

Continue Reading 0
Avartan-Powai-14-JULY-19

आवर्तन पवई “संडे स्पेशल” १४ जुलै २०१९

आवर्तन पवई “संडे स्पेशल” वाचण्यासाठी येथे किंवा इमेजवर क्लिक करा !

Continue Reading 1
vijay vihar rd july 2019

याचे श्रेय आता कोण घेणार? – पवईकर

पवईतील हिरानंदानी – पवई विहार रोडला जोडणाऱ्या विजय विहार रोडच्या दुरुस्तीनंतर याचे श्रेय घेण्यासाठी पोस्टर, बॅनर आणि सोशल माध्यमातून लोकप्रतिनिधींमध्ये चांगलाच श्रेयवाद रंगला होता. मात्र, या श्रेयवादाला आठवडा उलटायच्या आधीच विजय विहार रोडवर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली. पावसाळ्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसानेच या रस्त्याची दुर्दशा करत रस्त्यावर खड्डे कि खड्यात रस्ते अशी याची अवस्था केली. […]

Continue Reading 0

पवईत रेस्टोबारवर छापा, मालकासह ६ कर्मचाऱ्यांना अटक

पवईतील एका रेस्टोबारवर मुंबई पोलिसांनी छापा मारत रेस्टोबारच्या मालकासह सहा कर्मचाऱ्याना रविवारी अटक करण्यात आली. आस्थापनेला पब चालविण्याची परवानगी नव्हती आणि निर्धारित मुदतीच्या पलीकडे पब चालू ठेवण्यात आला होता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील जोगेश्वरी विक्रोळी […]

Continue Reading 0
sangharsh nagar guttar

संघर्षनगरमध्ये सुरुवातीच्या पावसातच गटारे भरली, घाण रस्त्यांवर; नालेसफाईचा फोलपणा उघड

उशिराने आगमन झालेल्या पावसाने सुरुवातीच्या दिवसातच मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या नालेसफाईचा फोलपणा उघड केला आहे. या सुरुवातीच्या पावसात चांदिवली, संघर्षनगर येथे सर्व ठिकाणी पाणी तुंबले होते. येथील अनेक गटारे सफाई न झाल्यामुळे पाण्याने भरून यातील सगळी घाण रस्त्यांवर आल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मार्केटमध्ये संपूर्ण रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरल्याने आणि दुर्गंधी येत […]

Continue Reading 2
british-nagrik powai police

पवई पोलिसांनी वाचवले ब्रिटिश नागरिकाचे प्राण, ब्रिटिश हाय कमिशनकडून कौतुक

नैराश्यात असणारा एक ब्रिटिश नागरिक आत्महत्येच्या प्रयत्नात असताना, दीड तास दरवाजातील पत्र टाकण्यासाठी असणाऱ्या जागेतून त्याची मनधरणी करत, पवई पोलिसांनी दाखवलेल्या संयम आणि प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. सॅम कॉलर्ड (६०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटीश नागरिकाचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले होते असे समोर आले आहे. याबाबत ब्रिटिश हाय […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes