जाहिरातीसाठी : ८८७९३१००७४, वृत्तसंपादक : ९८१९६१३९७४

संग्रहित छायाचित्र: nearfox

आयआयटीत पाण्याच्या वापराची चंगळ

आयआयटी विद्यार्थ्यांनी पाहणी व अभ्यास करून ‘इनसाइट’ या आपल्या नियतकालिकाच्या माध्यमातून वास्तव आणले समोर एकीकडे मुंबईकर पाणी टंचाईशी लढत असतानाच, अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) मुंबईतील पवई कॅम्पसमध्ये मात्र पाण्याची चंगळ चालू असल्याची खळबळजनक माहिती आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास पाहणीतून समोर आली आहे. मुंबईकरांना सरासरी २६८ लिटर पाणी दररोज वापरास […]

Continue Reading 0
powailake

आजपासून ३ दिवस पवई उद्यान व तलाव भागात थांबण्यास बंदी

आजपासून तीन दिवस, म्हणजेच २५, २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी पवई तलाव आणि उद्यान परिसरात पर्यटक आणि नागरिक यांना संध्याकाळी ५ नंतर थांबण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शरद पोर्णिमाचे (कोजागरी पोर्णिमा) निमित्त साधत ही बंदी महापालिकेतर्फे घालण्यात आलेली आहे. पवई तलाव आणि परिसर हे पूर्व उपनगरातील पर्यटन स्थळांपैकी सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणून मानले जाते. रविवारी […]

Continue Reading 2
sindur khela1

सिंदुर खेला, उत्सव सौभाग्याचा

एके काळी केवळ कलकत्ता पर्यंत मर्यादित असणारी दुर्गापूजा, आज कामानिमित्त विविध शहरात स्थायिक झालेल्या बंगाली लोकांमुळे जगभर पोहचलेली आहे. नवरात्रीच्या शेवटच्या पाच दिवसात साजरा होणाऱ्या या उत्सवात शष्टीपासूनच धूम असते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या या उत्सवात खास आकर्षण असते ते ढाकीच्या तालावर होणारा ‘धुनुची नाच’ आणि दसऱ्याच्या दिवशी दुर्गामातेच्या विसर्जनापूर्वी सुवासिनींनी मिळून खेळला जाणारा […]

Continue Reading 0
bmc action

हिरानंदानीत बेकायदा खाद्यविक्री दुकानांवर पालिकेची कारवाई

उपाहारगृहातील सिलेंडर स्फोटाने आठ जणांचा बळी घेतल्यानंतर, जाग आलेल्या पालिकेने गेले तीन दिवस मुंबईतील विविध हॉटेल्स आणि खाद्यविक्री केंद्रांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. याचाच एक भाग म्हणून, पालिका एस विभागाने मंगळवारी पवईतील हिरानंदानी भागात दुकानांच्या बाहेर बेकायदेशीररित्या चाललेल्या खाद्यविक्री दुकानांवर कारवाई केली. कारवाईची खबर लागताच अनेक बेकायदेशीररित्या चालणाऱ्या खाद्यपदार्थ विक्री दुकानदारांनी दिवसभर आपली दुकाने बंदच […]

Continue Reading 0
pbwa0

पवईत दुर्गापूजेची धूम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डीजे आणि वाद्यवृन्दांच्या तालावर बेभान होऊन रास-गरबा, दांडिया नाचणाऱ्या तरुणीला वगळले तर मुंबईकरांना आता वेड लागलेय ते दुर्गा पूजेचे. कलकत्तामध्ये नवरात्रीच्या दिवसात सहाव्या दिवसपासून पाच दिवस मातेचा उत्सव ‘दुर्गा पूजा’ रुपात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तिच संस्कृती आता सगळ्या संस्कृती आणि लोकांना आपलेसे करून टाकणाऱ्या मुंबईत पसरत चालली असून दांडिया, रासगरबापासून दूर पळणाऱ्या लोकांचे […]

Continue Reading 0
blast parksite

पार्कसाईटमध्ये घरात सिलेंडर स्फोट, ८ जण जखमी

पार्कसाईट विक्रोळी येथील आंबेडकरनगर सोसायटीत शनिवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन ८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी स्फोट झालेल्या घरातील दोघे गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घर रस्त्याला लागून असल्याने घरातील काही लोक आणि पादचारीही यांचा जखमींमध्ये समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी […]

Continue Reading 0
1424748232

पवईत ‘वर्ल्ड वॉकिंग डे’चे आयोजन

पवई | प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय संस्था तफिसातर्फे जगभर संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ या जागतिक उपक्रमाचा एक भाग म्हणून, ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्टस ॲड फिटनेस फॉर ऑलच्यावतीने, उद्या (रविवारी) दि. १८ ऑक्टोबरला सकाळी ७ ते ९ या वेळेत पवईतील हेरिटेज गार्डन हिरानंदानी येथे ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ आणि ‘हेल्दी ब्रिदिंग डे’चे आयोजन […]

Continue Reading 0
fraud

हिरानंदानी समूहाला ४ कोटींची टोपी, कुंपणानेच खाल्ले शेत

नामांकित विकासक हिरानंदानी समूहाला त्यांच्याच एका कर्मचाऱ्याने प्रसिद्धीच्या नावावर कोट्यवधीं रुपयांना गंडा घातला आहे. समूहाने आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून २ गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. आरोपी हा त्याच समूहात काम करत असताना, मित्राच्या मदतीने खोटी कंपनी स्थापन करून मोठी जाहिरात देण्याच्या नावावर ४ कोटींची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. […]

Continue Reading 1
marutinagar

मारूतीनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

लवकरच सुटणार संपूर्ण आयआयटी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आयआयटी | अविनाश हजारे आयआयटी भागात येणाऱ्या गढूळ व दुषित पाण्याच्या प्रश्नावर झालेल्या पाहणीनंतर, कामाचा पहिला टप्पा म्हणून पालिकेतर्फे मारुतीनगर येथील गंजलेली जलवाहिनी काढून नविन जलवाहिनी टाकण्यात आली. पहिल्या टप्यात किमान मारुतीनगरच्या नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तरी सुटलेला आहे. येत्या काही दिवसात इतरही ठिकाणी जलवाहिनी बदलून किंवा […]

Continue Reading 1

Powered by WordPress. Designed by WooThemes