महिलेच्या विनयभंग प्रकरणी पळून गेलेल्या चौघांना अटक

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील फुटपाथ ब्रिज वर एका महिलेशी अश्शील वर्तन करत, याचा जाब विचारणाऱ्या भावाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी पळून गेलेल्या चार आरोपींना पवई पोलिसांनी अटक केली आहे.

मुलुंड परिसरात राहणारी तक्रारदार महिला रविवारी सायंकाळी हिरानंदानी येथील मदिरा अंड माईस रेस्टोरंट मध्ये तिच्या भाऊ व मैत्रिणी सोबत जेवणासाठी आली होती. जेवणानंतर ते तिघेही घरी जाण्यासाठी निघाले होते. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील फुटपाथ ब्रिजवरून फोनवर बोलत खाली उतरत असताना, समोरून येणाऱ्या चौघांनी तिच्याशी अश्शील वर्तन करत विनयभंग केला. पुढे चालत असणाऱ्या भावाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने जाब विचारला. यावर त्या चौघांनी इथून निघून जा, नाहीतर वाईट परिणाम होतील असे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ते चौघेही तेथून पळून गेले.

या घटनेनंतर तक्रारदार महिलेने पवई पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगून त्या चौघा आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली होती. पवई पोलिसांनी गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपींना शोधण्याची मोहीम सुरु केली. ही शोधमोहिम सुरु असतानाच मंगळवारी आरोपी पवई प्लाझा परिसरात येणार असल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली. पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून सुरज यादव, कैलास यादव, सतीश गुप्ता, माका गुप्ता या चौघांच्या मुसक्या आवळल्या.

या चौघा आरोपींवर ३५४, ५०४, ५०६, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद झाला असून, त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, २६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

 

 

 

 

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes