मानसिक तणावाखाली आयआयटी पवईमध्ये विद्यार्थ्यांची आत्महत्या

suicideअभ्यासातील आपल्या कामगिरीविषयी असमाधानता व इंटर्नशिप न मिळाल्याची खंत, अश्या दुहेरी मानसिक तणावाखाली असलेल्या, मुंबई आयआयटीमध्ये केमिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या जितेश शर्मा नामक एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने कॅम्पसच्या होस्टेल क्रं. १५ च्या छतावर विष​ प्राशन करून आत्महत्या केली. तो राहत असलेल्या खोलीत त्याने आत्महत्येपूर्वी हिंदी व इंग्रजी अश्या दुहेरी भाषेचा वापर करून लिहलेली चिट्ठी पोलीसाना सापडली आहे. त्यात त्याने “आयआयटी जी परीक्षा देणे आणि ती पास होणे हि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. मी चांगली प्लेसमेंट मिळवण्यासाठी चाललो आहे. मला माहित आहे सगळ्या प्लेसमेंट इथूनच होतात, तेव्हा मला होस्टेल क्रमांक १५ मध्ये शोधा.” असा उल्लेख केला आहे. त्यातून हि आत्महत्या त्याने मानसिक तणावातून केली असल्याचे स्पष्ट होते असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुळचा रोहतकचा असलेला जितेश, हा आयआयटी कॅम्पसच्या हॉस्टेल क्रमांक ८ मध्ये आपल्या मित्रांसोबत राहत होत. शनिवारी संध्याकाळी सगळे मित्र बाहेर गेले असताना त्याने हॉस्टेल क्रमांक १५ मध्ये जाऊन हे टोकाचे पाऊल उचलले. चुकीचे क्षेत्र निवडल्याची भावना, परीक्षेत त्याची कामगिरी समाधानी होत नसल्यामुळे त्याच्या सोबत राहणाऱ्या विद्यार्थ्यान बरोबरचे त्याचे वागणे हि बदलले होते. तो सतत कुठल्या तरी विचारात व मानसिक तणावाखाली जगत असल्याचे त्याच्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ‘त्याची नुकतीच परीक्षा झाली होती, ज्यात एफआर (फेलिंग रेट) मिळण्याची भीती त्याला सतावत असल्याने त्याने हे पाऊल उचलले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आयआयटीमध्ये त्याचे समुपदेशन हि सुरू होते, तसेच त्याच्या पालकांनाही त्यास किमान महिन्यातून एकदा भेटण्याची कल्पना समुपदेशकांनी दिली होती’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पवई पोलिस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्याने आवर्तन पवईशी ह्या विषयी बोलताना सांगितले कि “आम्हाला संध्याकाळी ६.४५ च्या दरम्यान माहिती मिळाल्यावर आम्ही घटनास्थळी पोहचलो तिथे आम्हाला एक रसायनाची बाटली सापडली जी आम्ही फोरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे. त्याच्या राहत्या रूम मध्ये आम्हाला एक चिट्ठी सापडली असून त्यातून त्याने हि आत्महत्या मानसिक तणावातून केली असल्याचे उघड होतेय”.

शनिवारी दिवसभर त्याने आपल्या मित्रांसोबत भरपूर गप्पा मारल्या. संध्याकाळी ६.३० वा होस्टेल क्रमांक १५ च्या छतावर गेलेल्या एका विद्यार्थ्याला जितेश निश्चल अवस्थेत तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत आढळून आला, त्याने त्वरित इतर विद्यार्थी व सुरक्षा रक्षकांना सूचना दिली. आय आय टी स्थित रुग्णालयात नेण्यात आले परंतु तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टर्सनि स्पष्ट केले.

“पवई आयआयटीतील अनेक विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी मोठमोठ्या कंपन्यांकडून निवड झाली आहे. येत्या काही दिवसातच त्यांच्या इंटर्नशिप सुरु होणार आहेत. जितेश कोणत्याही प्रकारची इंटर्नशिप न मिळाल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून निराश होता, अशी माहिती त्याच्या काही मित्रांनी दिली. आणि त्या नैराश्यातूनच त्याने हे कृत्य केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

काय लिहले आहे चिट्ठीत

ह्या बद्दल बोलताना एका वरीष्ठ अधिकाऱ्याने ‘आवर्तन पवईला’ सांगितले कि हि चिट्ठी त्याने हिंदी भाषेत लिहिली असून मध्ये मध्ये इंग्रजी वाक्यांचा उपयोग केला आहे ज्यात तो मानसिक तणावात असल्याचे जाणवत आहे तो लिहतो की ” मै यह लिखू कि नही यह समज में नहीं आ रहां हैं, लेकिन फिर भी मैं लिख रहां हूँ। मैं बहुत जिना चाहता हूँ, पुरे ८० साल तक। लेकिन अगर यह ऐसे ही चलता रहा तो मैं पागल हो जवूंगा, और मुझे पागलों के अस्पताल में भर्ती करवाना पड़ेगा।

मैँ ऐसा नहीं करना चाहता हूँ, लेकिन मेरे पास अब कोई रास्ता नहीं बचा हें। मैंने इससे पहले भी एक बार कोशिश की थी लेकिन मैं बच गया था। आज दोबारा मैं जा रहाँ हूँ, मुझे सबसे बड़ी प्लेसमेंट मिलाने वाली हैँ ! हो सकता हैं मैं इस बार भी बच जावूं लेकिन मैं दोबारा कोशिश करूँगा।

आय आय टी जी एक्साम देना और वह पास होना मेरी जिंदगी की सबसे बड़ी गलती थी। वह न होता तो आज मैं ऐसा न होता खैर मुझे पता हैं सबकी प्लेसमेंट यहीं से होती हैं और मेरी भी यहीं से होगी।

रहां सवाल मेरे पेरेंट्स का उनको पता हैं मैं कितना सनकी हूँ ।

मैं जा रहन हूँ सबसे बड़ी प्लेसमेंट पाने मुझे हॉस्टल नंबर १५ के छत पे ढूंढो मैं वहीँ मिलूंगा (may be my body).

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes