यंग इन्वायरमेंटचा झाडे लावा झाडे जगवाचा नारा, हजारो चिमुकल्या हातांना वृक्षारोपणाचे धडे

छायाचित्र सहाय्य: mytravefootprints.blogspot.in

छायाचित्र सहाय्य: mytravefootprints.blogspot.in

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या पवईच्या यंग इन्वायरमेंट ग्रुपच्यावतीने, लहानग्यांना पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे धडे देण्यासाठी “या झाडे लावूया” या उपक्रमाचे आयोजन हिरानंदानीच्या हेरीटेज गार्डनमध्ये ५ जूनला संध्याकाळी ४.३० वाजता करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने बालक-पालक अशी जोडी या उपक्रमात सहभाग नोंदवणार आहे.

माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. लोकांच्या निसर्गाशी निगडीत गरजा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या गोष्टींच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून दिवसेंदिवस येणारी संकटे ही वाढत आहेत. अशात पर्यावरण रक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज होऊन बसली आहे. म्हणून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक संस्था झटत आहेत. पर्यावरण संवर्धनाचा हा संदेश जनमानसात आणि विशेषतः लहानग्यांच्यात रूजवण्यासाठी, पवईच्या यंग इन्वायरमेंट ग्रुपच्या वतीने ५ जून रोजी हेरीटेज गार्डनमध्ये वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

wed 13या वेळी जून महिन्यात येणारे ‘फादर डे’ आणि ‘जागतिक पर्यावरण दिन’ असे दोन्ही मुहूर्त साधत, पवई आणि आसपास परिसरात राहणाऱ्या बालक-पालक अशा जोडगोळीच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचा एक वेगळा प्रयोग यंग इन्वायरमेंट ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहे.

याबद्दल आवर्तन पवईशी बोलताना यंग इन्वायरमेंट ग्रुपच्या सर्वेसर्व्या यल्सी गेब्रील म्हणाल्या “पर्यावरण दिन, हा केवळ ५ जून या एकाच दिवशी नसून तो रोज असतो. निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तूंचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे; परंतु निसर्गाला परतफेड करण्यात आपण मात्र खूपच मागे आहोत, आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस संपूर्ण नष्ट होईल. तेव्हा आता निसर्गाला परतफेड करायची वेळ आली आहे आणि वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपण हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे. हे चिमुकले उद्याचे भविष्य आहेत आणि त्यांना जर पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे धडे भेटले तर भविष्यातला पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल आणि संवर्धन सुद्धा होईल. बालक आणि पालक यांचे एकमेकांशी घट्ट नाते असते तसेच नाते निसर्गाशी सुद्धा निर्माण व्हावे म्हणून आम्ही बालक-पालकांच्या हातून वृक्षारोपण ही नवी संकल्पना घेऊन आलो आहोत.

पवई आणि आसपासच्या परिसरात वाढणाऱ्या सिमेंटच्या जंगलांना निसर्गाचे सानिध्य लाभावे. पर्यावरण संवर्धनात आपला हि हातभार लागावा, म्हणून ५ जूनला होणाऱ्या हेरीटेज गार्डनमधील वृक्षारोपणाच्या उपक्रमात आपल्या पाल्यासोबत जरूर सहभागी होण्याचे आवाहन यंग इन्वायरमेंट ग्रुपच्या वतीने तमाम पवईकरांना करण्यात आले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!