यंग इन्वायरमेंटने केला सन्मान ‘ती’च्या कर्तुत्वाचा

स्त्रियांच्या प्रगतीवरून त्या समाजाची प्रगती मोजता येते असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत बाबासाहेबांनी पाहिलेल्या या प्रगत समाजाचे स्वप्न आज साकार होताना दिसत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहेत. अशाच काही स्त्रियांच्या कर्तुत्वाचा आणि प्रतिनिधित्वाचा सन्मान यंग इन्वायरमेंट ट्रस्ट संस्थेतर्फे जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधत करण्यात आला.

७ मार्च रोजी अनेक पुरस्कार अर्जित रोडास हॉटेलमध्ये ‘ती’च्या सन्मानाचा समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ निरंजन हिरानंदानी, प्रसिद्ध क्रिकेटपटू अजित आगरकर व त्यांच्या पत्नी फातिमा आगरकर, फिटनेस गुरु लीना मोगरे, अभिनेत्री जुही बब्बर, अभिनेते अनुप सोहनी उपस्थित होते.

सुपरमॉडेल सुचेता शर्मा जेम्स, स्नेहा जावळे (एसिड हल्ला पिडीत), नीनु चरणजीत आत्रा (संपादक – फस्ट लेडी), सुषमा प्रमोद चव्हाण (संपादक – आवर्तन पवई), कनुप्रिया अगरवाल (पवई वूमन नेटवर्किंग), इल्स रीनैर किणी (प्रख्यात वकील), अर्चना मस्करेन्हास (बेकिंग विशेषज्ञ), इम्प्रीत कौर (जीवन प्रशिक्षक), रीन्तु राठोड, निलू विर्क, अरुणा अग्रवाल (शिक्षणतज्ञ), निर्मला केवलानी (अपंगत्व चळवळ), बिनिता बागची (संशोधक), कणिका बावा (कलाकार आणि डिझायनर), उद्योजक आशा धन्नक, कृती गर्ग (संवर्धन), सरला वसावे (महिला पोलीस निरीक्षक), गोदावरी दीदी (ब्रम्हकुमारीज), प्रमिला श्रीमंगलम (मानसशास्त्रज्ञ), अंकिता अशोक (तरुण सामाजिक व्यावसायिक), लुबना एडम्स (फॉशन कोरिओग्राफर), शम्मी गुप्ता (योगा गुरु), आयेशा लोबो (समुद्र पर्यटन), विवियेन पोचा (प्रसिद्ध गायिका), व्होवी भग्वागर (चिकित्सक/ वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ), स्मिता देव, रेशमा शेलटकर, प्रज्ञा जोगळेकर, डॉ वैशाली सावंत, डॉ जयना स्वप्नील शहा (वैद्यकीय विशेषज्ञ), लेखिका रिटा मल्होत्रा, दिपिका दवे (व्यावसायिका), वैशाली पाटील (नगरसेविका), राधा रेवरकर (प्रसिद्ध गायिका), सौम्या वर्मा आणि मोनिका सिंग (न्यूयॉर्क येथील एसिड हल्ला पिडीत) या महिला नेतृत्वांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

“आज स्त्रिया पुरुषांच्या केवळ बरोबरीने नाहीत, तर पुरुषांच्या दोन-चार पाऊले पुढेच आहेत” असे यावेळी महिलांच्या सन्मानार्थ बोलताना डॉ निरंजन हिरानंदानी म्हणाले.

अकरा वर्षापूर्वी सुरु झालेल्या यंग इन्वायरमेंटलिस्ट अचिर्व्हमेंट अवार्ड वर्षानुवर्ष नवनवीन स्तरावर जात प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करत महिलांना पुढे जाण्याचे प्रोत्साहन देत असते.

“महिला घर-संसार, समाज, अर्थव्यवस्थासह अनेक ठिकाणी आपल्या सर्वशक्तीनिशी मोलाची भूमिका बजावत असतात. सोबतच ‘ती’ आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी नेहमीच धडपडत असते. अशा ‘ती’ला कोणकोणत्या अडचणी येतात, त्यांचा ‘ती’ सामना कशा प्रकारे करते, ‘ती’ काय करते हे समाजापुढे आणण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि त्यांना सन्मानित करून आम्ही त्यांच्या धाडस आणि कर्तुत्वाचा सन्मान करून इतर महिलांनासुद्धा प्रोत्साहित करतो.” असे यावेळी बोलताना यंग इन्वायरमेंटच्या संस्थापिका एल्सी गेब्रिल यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes