युथ पॉवरची आरोग्य सेवा योजना; दरमहा रूग्णालयात करणार मोफत फळे वाटप

 

पवई | रविराज शिंदे

शारीरिक व मानसिक दृष्टिने रोगमुक्त आणि तंदुरुस्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य. प्रत्येक नागरिकांने रोगमुक्त राहवे म्हणून पवईतील नवतरूणांच्या युथ पॉवर या संघटनेने आरोग्य सेवा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत संघटनेच्यावतीने गेल्या दोन महिन्यापासून उपनगरातील जवळपास सर्वच सरकारी रूग्णालयात रूग्णांना आरोग्यास हितकारक असणाऱ्या फळांचे वाटप केले जात आहे.

भांडूप येथील सावित्रीबाई फूले प्रसूतिगृह, सुर्यानगर विक्रोळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रसूतीगृह, कन्नमवार नगर येथील महात्मा फूले सर्वसाधारण रूग्णालयात येथे शनिवारी फळे वाटप करण्यात आली.

“आरोग्य सेवा हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट असून, त्याप्रमाणे आमची संपूर्ण टिम काम करत आहे. आरोग्य सेवां बरोबरच रूग्णालयात रूग्णांना होणारा त्रास, येणाऱ्या अडचणी व आवश्यक गरजा जाणून घेवून त्यांच्या निवारणासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत”, असे यावेळी बोलताना संघटनेचे मुंबई अध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी सांगितलं.

आरोग्य सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे प्रसाद चव्हाण, रमेश कांबळे, अमोल चव्हाण, जितेंद्र धिवार, राहूल कदम, प्रतिक कांबळे हे मेहनत घेत आहेत.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes