लेक होम आग प्रकरण: लेक लुक्रीन सोसायटी विरोधात गुन्हा दाखल

छायाचित्र: ऑलीविया डिसुझा

छायाचित्र: ऑलीविया डिसुझा

पवई येथील लेक होम्स, लेक लुक्रीन या २१ मजली इमारतीच्या १४व्या मजल्यावर शनिवारी ६ जूनला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर २८ जण जखमी झाले होते. या आगीची चौकशी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती, त्यांनी गुरुवारी आपला अहवाल अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना सादर केला. पाण्याची फवारणी करणारे स्प्रिंकलर्स इमारतीत १४व्या माळ्यापर्यंत नव्हते, प्रसंगी वापरण्यात येणारे सुरक्षेचे मार्ग कुठे आहेत याची माहिती देणारे फलक लावण्यात आले नव्हते, इमारतीच्या आवारात बेशिस्त पद्धतीने गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या, अशा अनेक त्रुटींकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. याबाबत केलेल्या चौकशीअंती या घटनेसाठी सोसायटीच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत अग्निशमन दलाने गुरुवारी पवई पोलीस स्टेशनमध्ये सोसायटी प्रशासना विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या अहवालानुसार, एअर कंडिशनच्या कॉम्प्रेसरमध्ये शॉटसर्किट होऊन ही आग लागली होती. २१ मजल्याच्या या इमारतीत तळमजल्यापासून १४व्या मजल्यापर्यंत स्प्रिंकलर्स आढळून आले नाहीत. स्प्रिंकलर्स असते तर आग विझवण्यास मदत झाली असती. लिफ्ट जळाल्या, त्या धुरात गुदमरून लिफ्टमधील व्यक्तींना प्राण गमवावे लागले, सुरक्षितस्थळी जाण्यासाठी इमारतीत रेफ्युजी एरिया होता, मात्र हा एरिया कोणत्या मजल्यावर आणि कुठे आहे, याची माहिती देणारे फलक लावण्यात आले नव्हते. छताला टाळा मारण्यात आला असल्याने लोकांना छतावर जाता आले नाही आणि ते अडकून पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनाही रेफ्युजी एरिया शोधताना खूप त्रास झाला. इमारतीच्या आवारात गाड्यांची बेशिस्त पार्किंग असल्याने अग्निशमन दलाच्या फायर इंजिनना वेळेमध्ये पटांगणात पोहोचता आले नाही, असे या अहवालात म्हटले आहे.

या बाबत बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले ‘आम्ही तक्रार नोंद केली करून तपास सुरु केला आहे.

आगीच्या प्रकरणा बद्दल पोलीस काय म्हणतात?

आगीबाबत समजताच प्रथम पोलीस स्टेशनचे एक अधिकारी आणि शिपाई घटनास्थळी पोहचले होते. काही वेळातच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनेची भीषणता लक्षात घेता अग्निशमन दलाची वाट न बघता पवई पोलीस ठाण्याचे शिपाई संदिप साळवी, तुषार गरूड, विनायक चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज राऊत यांनी इमारतीमध्ये आप-आपल्यापरीने बचावकार्य सुरू केले. काहींनी परिसरातील गर्दी हटवणे जागा रिकामी करणे, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी घेवून जाणे अशी कामे केली. अग्निशमन दल येण्याआधी पवई पोलीस पथकाने पाच ते सहा कुटुंबांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढले होते. या धडपडीत शिपाई संदीप साळवी जखमी झाले.

काही रहिवाशी बचावकार्यात मदत करण्या ऐवजी पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचे काम करत होते. पोलिसांनी इमारत परिसरात बचावकार्यात अडथळा निर्माण करतील अशा रितीने पार्क केलेल्या गाडया हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र रहिवाशांनी त्याकडे दुर्लक्ष करत तशा परिस्थितीत सुद्धा पोलिसांशीच वाद घातला होता. काहींनी बचावकार्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या तोंडावर दार आपटले. काहींनी चोरीच्या भीतीने घरातून बाहेर येण्यास मनाई केली. पोलीस खात्याचे वरीष्ठ अधिकारी जेव्हा अडकलेल्या स्थानीकाला खाली या म्हणून सांगण्यास गेले तेव्हा “माझी सगळी संपत्ती कोणीतरी चोरून नेईल मी येणार नाही” बोलून त्या व्यक्तीने दार लावून घेतले.

रहिवाशी किंवा सोसायटी प्रशासनाचे मत

या बाबत स्थानिक रहिवाशी बोलण्याच्या मनस्थिती नव्हते पण नाव जाहीर न करण्याच्या अटीवर प्रशासनातील एका व्यक्तीने सांगितले कि “आम्ही आता काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहोत. आम्ही सध्या आमच्यासाठी झटणाऱ्या त्या लोकांना कशी मदत करू शकतो, ज्या विंगमध्ये हा प्रकार घडलाय तिला लवकरात लवकर मूळ स्थितीत आणून आम्हाला लोकांचे सामान्य जीवन सुरू करायचे आहे. सोमवार पासून मुलांच्या शाळा सुरु होत आहेत. या घटनेमुळे आमच्या बिल्डिंगमधील मुलांची अवस्था खूप खराब आहे, ते खूप घाबरलेत त्यांचे समुपदेशन चालू आहे. रहिवाश्यांची अवस्था पण दयनीय आहे, सर्व सोडून मित्र, नातेवाईक यांच्याकडे ते दिवस काढत आहेत. बरेच काही पुढे मांडलेले आहे. मी फक्त एवढेच म्हणेन हे जे सगळे सांगतायत कि आम्ही मदत केली नाही किंवा आम्ही उद्धट वागलो हे साफ खोटे आहे. उलट आमच्याच बऱ्याच लोकांनी बचावकार्यात सहभाग घेतला होता आणि हे लोक तमाशा बघत होते. आम्ही आमच्या या प्रसंगातून सावरलो कि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देवू.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!