कविता: शाळा मराठी भाषेची

गणिताची आकडे मोड अन

विज्ञानाचा तो प्रयोग बघा

भुगोलात खगोलातील ग्रह

अन इतिहासात शिवाजी बघा

 

प्रयोगाची गम्मत ही न्यारी

आकाशातले तारे बघा

अफजल खानाचा वध तो

इतिहासात पुर्ण वाचुन बघा

 

गणिताची बेरीज वजाबाकी

हातावर मोजता येते बघा

विज्ञानात मजला सगळे

सजीव निर्जीव दिसते बघा

शिवनेरीचा शिवनेरी किल्ला

अन हिरकणीचा इतिहास बघा

विज्ञानातील प्रयोगाची तुम्ही

गंमतीशीर जादू बघा

 

मराठी,विज्ञान,इतिहास, अन

भूगोल सुध्दा मराठीत असतो

या मराठी मातृभाषेत मला

सगळा हिरवा निसर्ग दिसतो

 

नका करू मराठी शाळा बंद

नका लावू त्या शाळांना टाळे

कसे कळतील आम्हा विद्यार्थ्यांना

शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे लढे

 – प्रतिक कांबळे – पवई – ९७०२२०६३७२

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!