साकिनाका भागात चोर समजून चोप दिल्याने एकाचा मृत्यू, ३ जणांना अटक

साकिनाका पोलिसांनी मंगळवारी उशिरा तीन व्यक्तींना, एका व्यक्तीला चोर समजून बेदम चोप देवून, त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे रेहमान अली खान (२६), हबीब शेख (२०) आणि राजकुमार यादव (२४) अशी आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

अटक आरोपी हे पुठ्याच्या गोडावूनमध्ये काम करत असून ते त्याच गोडाऊनमध्ये झोपत. नेहमी प्रमाणे ते गोडावूनमध्ये झोपले असताना, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास एक अनोळखी २३ वर्षीय इसम गिल्बर्ट कंपाऊंड येथील त्यांच्या गोदामात घुसला होता. तिथे झोपलेल्या त्या तिघांना तो दिसताच, चोर समजून त्याला पकडून, बांधून ठेवून बेदम चोप देण्यात आला.

“मंगळवारी उशिरा आसपासच्या परिसरातील लोकांना याबाबत माहिती पडल्यावर, त्यांनी साकिनाका पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस पथकाने त्वरित बळीत व्यक्तीला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले; परंतु तिथे आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर त्यास मारहाण करणाऱ्या तिघांना खुणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले असून, आम्ही शवविच्छेदन अहवाल येण्याची प्रतीक्षा करत आहोत.” असे साकिनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी avartanpowai.info शी बोलताना सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले “बळीत व्यक्तीची ओळख पटली नसून, आम्ही त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. तो त्या ठिकाणी त्या वेळेस कोणत्या कामासाठी गेला होता याचाही तपास आम्ही करत आहोत.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes