कांजूरच्या हूमा सिनेमात मनसेचे आंदोलन

रविराज शिंदे

मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेवून जाण्यास आणि मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे दर कमी करण्याबाबत विधिमंडळात निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याला बाजूला सारत राजरोसपणेआपल्याच तालात चालणाऱ्या मॉल विरोधात मनसेने इशारा देवूनही काहीच परिणाम जाणवत नसल्यामुळे, मनसेने मंगळवारी हुमा सिनेमा येथे व्यवस्थापना विरोधात घोषणा देत आंदोलन केले.

मल्टिप्लेक्स मॉलमधील खाद्यपदार्थाच्या दर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुकारलेल्या खळखट्याक आंदोलनाची दखल विधीमंडळात घेण्यात आली होती. मल्टिप्लेक्स मॉलमधील खाद्यपदार्थाचे दर कमी करणे, तसेच बाहेरील खाद्यपदार्थ मॉलमध्ये घेवून जाण्यास अनुमती देण्याचा निर्णय एकमताने विधीमंडळात पारित करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही अनेक मॉल, सिनेमागृहात या निर्णयाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

मॉलच्या या मनमानी कारभारा विरोधात मनसैनिक पुन्हा आक्रमक झाले आहेत. कांजूरमार्ग येथील हुमा सिनेमागृहात मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने व्यवस्थापना विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसैनिकांच्यावतीने बाहेरील खाद्यपदार्थ समोसा, वडापाव सिनेमागृहात नेवून वाटण्यात आले.

अखेर हूमा सिनेमा व्यवस्थापनाशी सर्व खाद्यपदार्थ दर कमी करणे व बाहेरील खाद्यपदार्थास सिनेमागृहात नेण्यास मज्जाव करू नये असे आदेश देत आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतरही व्यवस्थापनाने आपली चाल बदलली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा मनसैनिकांनी यावेळी दिला.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!