​पवईत “अंधश्रध्दा निर्मूलन आणि प्रबोधनाचा”​ गजर

रविराज शिंदे, अविनाश हजारे (आवर्तन पवई)

andhshraddhaदेशाचे भविष्य असणारा व चळवळीची धुरा सांभाळत चित्र बदलण्याची धमक असणारा तरुण वर्ग हा दैववाद अंधश्रध्देचा बळी ठरत आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता, न्याय व अहिंसा ही विशेष मूल्य अंतर्भूत असलेल्या विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासणाऱ्या बौध्द धम्माची दिक्षा देवून ५९ वर्षाचा कालावधी उलटूनही  समाज आजही तथाकथित धर्मातील अनिष्ट रूढी, परंपरा, दैववाद, कर्मकांड यांच्या जोखडातून आजही पूर्णपणे मुक्त झालेला नाही, हे पाहता पवईतील “स्वराज्य युथ क्लब पवई” या नवतरुणांच्यावतीने “अंधश्रध्दा निर्मूलन आणि प्रबोधन” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले नगरात करण्यात आले होते.

या कार्यक्रमास अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे, नरेंद्र राणे, तलाशिळकर आदि मंडळी उपस्थित होते. बुवाबाजी, जादूटोणा, लैंगिक शोषणाबाबत समाजाची कशाप्रकारे फसवणूक करण्यात येते याची प्रात्यक्षिके अनिंसच्या वंदना शिंदे यांनी लोकांसमोर सादर केली. अंधश्रध्दा निर्मूलन आखणी कशी करता येईल व या अंधश्रध्दा कांडापासून सावध कसे व्हाल? याबाबतची जनजागृती अनिंसचे नरेंद्र राणे व तलाशिळकर यांनी पवईकरांमध्ये केली.

दि बुध्दाज आर्ट कलामंचच्या वतीने “देव म्हणजे देवाण-घेवाण” या विषयावर अतिशय सुंदर असे प्रबोधनात्मक पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले. अंधश्रध्दा विरोधात आवाज उठवणाऱ्या व समाज प्रबोधन करणाऱ्या डॉ दाभोळकर, कॉ पानसरे, डॉ कलबुरगी यांची हत्या कशी करण्यात आली याची प्रात्यक्षिके पथनाट्यातून सादर करण्यात आली. अंधश्रध्दे विरोधात प्रबोधनात्मक संदेशही कला मंचतर्फे देण्यात आला.

कार्यक्रमास पत्रकार दिलीप हजारे, संजय भालेराव, रवि खांडेकर, पांडुरंग ओव्हाळ, प्रभाकर मोरे सह पार्कसाईड पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी यावेळी बोलताना, “बुबाबाजी, जादूटोणा करून लोकांची फसवणूक करणाऱ्यां विरोधात शासन करण्यास पोलिस सक्षम आहे. अंधश्रध्देच्या आहारी जावू नका, जर कोणी तुम्हाला अंधश्रध्देच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करत असल्यास थेट तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा. त्यानंतर त्यावर शासन करण्याच काम आम्ही करू” असे आव्हान उपस्थित पवईकरांना केले.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!