आयआयटी कॅम्पसमध्ये किरकोळ आग

iit fireयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये मंगळवारी संध्याकाळी किरकोळ आग लागल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी बनवलेल्या वस्तीगृहाच्या पाठीमागील बाजूस भंगार साठवून ठेवण्याच्या ठिकाणी ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या एका इंजिनच्या मदतीने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मंगळवारी संध्याकाळी ५.२५ वाजण्याच्या सुमारास कॅम्पसच्या आतील भंगार, कचरा साठवून ठेवण्याच्या ठिकाणी ही छोटीशी आग लागली होती. यात कोणीही जखमी झाल्याची घटना नाही, आगीचे नक्की कारण समजू शकले नाही. तपास सुरु आहे’

याबाबत संस्थेच्यावतीने माध्यमांना सांगण्यात आले आहे कि, “ती मोठी घटना नव्हती, काही लहान स्क्रॅप साहित्यास आग लागली होती, ज्याच्यावर त्वरित नियंत्रण मिळवले गेले आहे.

Like Our Facebook Page

 

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!