खड्डेमय पवईची वाहतूक पोलिसांकडून डागडुजी

@ रविराज शिंदे

road workजोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला वाहतूक कोंडीने ग्रासले असतानाच या मार्गावर असणाऱ्या खड्यांनी त्यात आणखी भर घातली होती. एमएमआरडीए, पालिका व स्थानिक प्रतिनिधी यांना तक्रारी जावून सुद्धा त्यांनी याकडे कानाडोळा केल्याने अखेर गुरुवारी पावसाच्या उघडीपीची संधी साधत साकीनाका वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. या कार्यातून त्यांनी स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाला एक चांगली सणसणीत चपराक दिली आहे.

पालिकेच्या गलथान कारभारामुळे खड्डेमय शहर म्हणून मुंबई शहराकडे पाहिले जाते आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी खड्ड्यांचे तलाव पहावयास मिळत आहेत. पालिकेकडून मात्र कासव गतीने खड्डे बुजविण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे.

पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर सुद्धा मोठ्या प्रमाणात असणाऱ्या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहनचालक व प्रवासी त्रस्त झालेले आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी जनप्रतिनिधी व प्रशासन यांना पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून डोळेझाक केली जात असल्याने चक्क साकीनाका ट्राफिक पोलिसांनीच पुढे सरसावत पवईच्या हद्दीत असणारे खड्डे बुजविण्याचे काम गुरुवारी केले. वाहतूक पोलिसांच्या या कृत्यासाठी पवईकरांकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

वाहतुक कोंडीने ग्रासलेल्या या रोडवर खड्ड्यांमुळे दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. ट्राफिक हाताळताना आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे वाढणाऱ्या वाहतूक कोंडीला पाहता आम्ही स्वतःच रस्त्यावर उतरत खड्डे बुजविण्याच निश्चित करून आज पावसाच्या उघडीपीत हे काम करून घेतले आहे,” असे आवर्तन पवईशी बोलताना साकीनाका वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पवईच्या इतर रस्त्यांवर सुद्धा खड्यांचे साम्राज्य आहे, महानगरपालिका व स्थानिक नगरसेवक या खड्डेमय रस्त्यावर कधी लक्ष देणार? असा संतप्त सवाल पवईकर करत आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!