गटारात पडलेला फोन काढायला गेलेल्या दोघांचा मृत्यू

सचिन पवार, अजय कुंचीकरवे

टार सफाईवेळी आतमध्ये पडलेला मोबाईल काढायला गेलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साकीनाका परिसरात घडली. पवईतील तुंगा गावात राहणारा सचिन सुरेश पवार (२३), कुर्ला येथे राहणारा अजय उर्फ श्रीनिवास भगत कुंचीकरवे (२१) अशी या तरुणांची नावे आहेत.

अजय आणि सचिन हे पालिकेच्या सफाई विभागात कंत्राटवर सफाई कामगार म्हणून काम करतात. याव्यतिरिक्त फावल्या वेळात दोघेही तुंबलेली गटारे साफसफाईची खाजगी कामे सुद्धा करत असत. “गुरुवारी संध्याकाळी साकीनाका येथील कमानी मिलजवळ असणाऱ्या एका कॅन्टीनची जाम झालेली पाईपलाईन साफ करण्यासाठी ते दोघे आले होते” असे याबाबत सांगताना साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

येथील जवळच असणारी मँनहोल खोलून काम करत असताना अजयचा मोबाईल त्याच्यात पडल्याने तो मोबाईल शोधण्यासाठी खाली उतरला होता. मात्र आत गुदमरू लागल्याने अजय बचावासाठी ओरडू लागला. त्याला वाचवायला गेलेल्या सचिनलाही भोवळ आल्याने तोही आतमध्ये पडला. याबाबत प्रत्यक्षदर्शिनी साकीनाका पोलिसांना माहिती दिल्यावर अग्निशमन दलाच्या साहय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले.

त्यांना राजावाडी रुग्णालयात घेवून गेले असता सचिनचा दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर, अजयचा उपचारा दरम्यान शुक्रवारी राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला असल्याचे साकीनाका पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!