चैतन्यनगरमधील कचऱ्याच्या प्रश्नामुळे नागरिक त्रस्त

नगसेवकांचे पालिकेकडे अंगुली दर्शन, तर नगरसेवकांनीच कचरा उचलण्यास मनाई केली असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे.

रमेश कांबळे

वई, आयआयटी येथील चैतन्यनगर येथे गेले महिनाभर रस्त्यावर गटाराच्या शेजारी पडलेल्या कचऱ्याच्या ढिगामधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, या भागात निवडून दिलेले आणि नामनिर्देशित असे दोन नगरसेवक असून सुद्धा नागरिकांचा प्रश्न मिटताना दिसत नाही. विशेष म्हणजे नगरसेवकांनीच कचरा उचलण्यास मनाई केले असल्याचे पालिकेकडून सांगितले जात आहे.

पालिका निवडणुकीनंतर स्वच्छ पवई – सुंदर पवईचा नारा देत भाजपाने पवई परिसरात स्वच्छतेचे काम हाती घेतले. सुरुवातीला जोशात सुरु झालेल्या या कार्याला काही दिवसातच ब्रेक लागला. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक १२२ मधून निवडून आलेल्या नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी हे दोघेही याच पक्षाचे प्रतिनिधी असून, स्थानिक भागात राहतात. त्यांचे कार्यालयही कचऱ्यापासून १०० मीटरवर आहे. तरी त्यांच्या नजरेतून स्थानिकांची समस्या कशी सुटली? का ते जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत आहेत असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

गेल्या महिनाभरापूर्वी चैतन्यनगर येथील भागात नळ पाईपलाईन टाकण्याचे तसेच अनेक नाल्यांच्या साफसफाईचे काम पालिकेकडून केले गेले होते. यावेळी नाल्यातून काढलेला मलबा आणि खोदकामातून निघालेला कचरा तेथेच बाजूला रस्त्यावर साठवण्यात आला आहे. “या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. आजार पसरवणारे कीटकांची उत्पत्ती होऊन परिसरात आजार पसरण्याची भीती सुद्धा आहे” असे याबाबत बोलताना काही स्थानिक नागरिकांनी सांगितले.

या परिसरात मुख्य मार्केटही असल्यामुळे अनेक लोक येथे खरेदीसाठी येत असतात. दुर्गंधी आणि घाण पसरल्यामुळे कचरा पडलेल्या भागात असणाऱ्या दुकानांमध्ये लोक येण्यास टाळत आहेत, ज्यामुळे त्यांच्या धंद्यावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत असल्याचे याबाबत बोलताना काही पिडीत दुकानदारांनी सांगितले.

स्थानिक नगरसेवक आणि प्रतिनिधी यांच्यासमोर आवर्तन पवईने सदर मुद्दा मांडला असता त्यांनी “आम्ही पालिकेला याबाबत कळवले आहे, मात्र ते अजून कचरा उचलायला आले नाहीत.” असे उत्तर देवून आपला हात झाडण्याचा प्रयत्न केला.

आवर्तन पवईने पालिका ‘एस’ वार्ड घनकचरा विभाग कनिष्ठ अभियंता शिरसाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “नगरसेवक यांनीच तो कचरा उचलायला मनाई केली आहे” असे सांगितले तर दुय्यम अभियंता खोपकर यांनी “सगळीकडेच कचरा पडला आहे. आमच्याकडे केवळ एकच गाडी आहे, आम्ही कुठून कुठून कचरा उचलायचा?” असे बोलत पालिकेच्या भोंगळ कारभाराचे प्रतीकच दिले.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!