आजपासून ३ दिवस पवई उद्यान व तलाव भागात थांबण्यास बंदी

powailake

संग्रहित छायाचित्र

जपासून तीन दिवस, म्हणजेच २५, २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी पवई तलाव आणि उद्यान परिसरात पर्यटक आणि नागरिक यांना संध्याकाळी ५ नंतर थांबण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शरद पोर्णिमाचे (कोजागरी पोर्णिमा) निमित्त साधत ही बंदी महापालिकेतर्फे घालण्यात आलेली आहे.

पवई तलाव आणि परिसर हे पूर्व उपनगरातील पर्यटन स्थळांपैकी सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणून मानले जाते. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि स्थानिकांची येथे गर्दी असते; परंतु ऐन रविवारी सुट्टीच्या दिवशी आणि कोजागरी पौर्णिमेच्या काळात या परिसरात बंदी घातल्याने नागरिकांच्यात नाराजीचे सुरु उमटू लागले आहेत. तलाव भागात बनवण्यात आलेले निसर्ग उद्यान हे संध्याकाळी ५ नंतरच उघडले जाते, जे पर्यटकांचे आणि विशेषतः जोडप्यांचे खास आकर्षणाचे ठिकाण आहे; परंतु ५ नंतर या भागात प्रवेश नाकारला जाणार असल्याने लोकांच्यात नाराजी पसरली आहे.

तीन दिवस सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या वेळेतच या परिसरात लोकांना थांबण्यास अनुमती दिली जाणार आहे. संध्याकाळी ५ नंतर कोणासही थांबण्यास किंवा उद्यानात प्रवेश दिला जाणार नाही आहे. याबाबत पालिकेतर्फे स्थानिकांना सूचना देवून सहकार्य करण्याची विनंती सुद्धा करण्यात आलेली आहे.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

2 Responses to आजपासून ३ दिवस पवई उद्यान व तलाव भागात थांबण्यास बंदी

  1. Avinash Hazare October 25, 2015 at 6:13 pm #

    पण,कारण काय?

    • प्रमोद October 25, 2015 at 7:01 pm #

      स्वच्छता मोहीम राबवणार आहेत असे निवासी समिति कडून सांगितले गेले आहे.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!