दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

GANESH VISARJAN FRIDAY

णपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गर्जनेत, ढोल-ताशे, डीजे व बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले.

गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर शुक्रवारी आपल्या भक्तांचा निरोप घेतला. मुंबईत अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव आणि समुद्रात गणेश विसर्जन करण्यात आले. पवईमध्ये मुख्य गणेशघाट आणि गणेशनगर गणेशघाट अशा दोन ठिकाणी घरगुती गणेशांचे विसर्जन करण्यात आले.

संध्याकाळी 4 वाजल्यापासूनच पवईमधील अनेक रस्त्यांवर हातगाडी, टेम्पो, रिक्षा, कारमध्ये बसून बाप्पा निरोपाला निघालेले होते. पवई आणि साकिनाका पोलिसांनी ही ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतलेली होती. पवई येथील दोन्ही विसर्जन घाटावर रात्री उशीरापर्यंत अनेक छोट्या मोठ्या बाप्पांचे ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा आग्रहाचे निमंत्रण देत विसर्जन करण्यात आले.

येथील अनेक कुंटुबांनी दीड दिवसांचा गणपती बसविला होता. रिद्धीसिद्धी आणि बुद्धीचा देवता बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमनच जीवनातील दु:ख दूर करतो, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या अनेक गणेशभक्तांनी यावेळी व्यक्त केली.

आज गौराईचे आगमन

शनिवारी, म्हणजे आज गौराईचे आगमन होणार असल्याने बऱ्याच ठिकाणी ‘गौराई माझी लाडाची-लाडाची ग’ असे सुरु ऐकू येऊ लागलेले आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

One Response to दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

  1. samyak September 20, 2015 at 12:42 am #

    अप्रतिम छायाचित्रण आणि विश्लेषण

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!