परिसर स्वच्छतेसाठी नगरसेवकांनीच हातात घेतला झाडू

सफाई पूर्वी परिसर

यआयटी येथील विविध भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरत असल्याची दखल घेत विभाग क्रमांक ११५ चे नगरसेवक चंदन शर्मा यांनी हातात झाडू घेत परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. सोबतच लोकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले.

ओल्ड पवई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयटी परिसरात अजूनही हजारो कुटुंबे झोपडपट्टी भागात राहतात. अजून पर्यंत छोट्या छोट्या सुविधा सुद्धा यापैकी बऱ्याच भागात पोहचू शकलेल्या नाहीत, त्यामुळे नागरिक अनेक समस्यांशी सामना करताना आढळून येतात. आयआयटीमधील अनेक भागात कचरा व्यवस्थापन ही सगळ्यात मोठी समस्या आहे. ठिकठिकाणी अनेक भागात कचऱ्याचे ढिग लागलेले आढळून येतात. अनेक भागात घंटागाडी किंवा कचऱ्याची गाडी पोहचत नसल्याने तिथे महिनोंमहिने कचऱ्याचे साम्राज्य असते. कचरा तिथेच सडून परिसरात आजार पसरत असतो.

सफाई नंतर परिसर

सफाई नंतर परिसर

अनेक भागात घरांचे बांधकाम चालू असते, त्याचा मलबा परिसरातील रस्त्यांवर आणून टाकला जातो. नागरिक सुद्धा तिथेच घरातून निघणारा कचरा टाकत असल्याने अनेक परिसर कचराकुंडी होऊन बसलेले आहेत. रमाबाईनगर भागात असेच कचऱ्याचे साम्राज्य पसरून आजार पसरत असल्याची बातमी आवर्तन पवईने केल्यानंतर महानगरपालिकेने मलबा टाकणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करत रमाबाईनगर सोबतच आसपासचे अनेक परिसरातील कचरा हटवण्याचे काम केले होते.

महानगरपालिका स्वच्छता मोहिमेला महिना सुद्धा पूर्ण झाला हि नसेल की, आयआयटीमधील अनेक परिसरात पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य पसरू लागले आहे. जे पाहता विभागाचे स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांनी शनिवारी स्वतः हातात झाडू घेत देवीनगर परिसरात स्वच्छता मोहीम राबवत सगळा कचरा साफ करून घेतला. नागरिकांना कचरा ठिकठिकाणी असलेल्या कचराकुंडीतच टाकण्याबाबत प्रबोधन केले. नवीन बांधकाम चालू असणाऱ्या घरांचा निघणारा मलबा रस्त्यावर किंवा परिसरात टाकण्यापासून स्थानिकांनी ठेकेदारांना रोखथांब करावी, त्यानंतरही त्यांनी नाही ऐकल्यास सरळ पालिका किंवा नगरसेवक कार्यालयास माहिती पुरवण्याबाबत सांगण्यात आले.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!