पवईकरांच्या समस्या आता कार्टून बॅनरच्या माध्यमातून

posterनेक वर्ष समस्यांशी लढणाऱ्या पवईकरांनी पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेट, आंदोलन, लोकप्रतिनिधींसाठी बनवलेली माध्यमे अशा अनेक प्रकारे आपल्या समस्या लोकप्रतिनिधीं समोर मांडल्या आहेत, परंतु त्याचे निवारण सोडा, साधे उत्तर सुद्धा लोकप्रतिनिधींकडून मिळत नाही आहे. म्हणूनच लोकप्रतिनिधींना आपल्या समस्या समजावून देण्यासाठी स्थानिक जनतेने आता लोकप्रतिनिधी वापरात असलेल्या बॅनरबाजी या माध्यमाचाच वापर केला आहे. मात्र या बॅनरवर अक्षरातून नव्हे तर व्यंगचित्रांच्या माध्यमातून पवईकराने ही समस्या मांडलेली आहे.

आयआयटी येथील नागरिक खेळाचे मैदान, बगीचे, उद्यानाची दुरुस्ती व लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याचे ठिकाण अशा अनेक समस्यांशी गेली अनेक वर्ष सामना करत आहेत. जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावर आयआयटी मार्केट ते मिलिंदनगर या भागात एकही सार्वजनिक शौचालय नाही, ही पवईकरांसाठी आणि येथे येणाऱ्या लोकांसाठी एक खूप मोठी समस्या आहे. अशा अनेक समस्या स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, पत्रव्यवहाराद्वारे व प्रतिनिधींना आपले प्रश्न विचारणे आणि समस्या मांडण्यासाठी बनवलेले माध्यम अशा सर्व मार्गातून मांडलेल्या  आहेत, परंतु लोकप्रतिनिधी त्याच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसत असल्याने, स्थानिक नागरिकांनी त्यांच्याच बॅनरबाजीच्या माध्यमाचा वापर करत आपल्या समस्या जगजाहीर मांडलेल्या आहेत.

स्थानिक नागरिक विनोद लिपचा यांनी खेळाचे मैदान, सार्वजनिक शौचालय अशा समस्या सोबतच पालिका रुग्णालयाला डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी कार्टून बॅनरच्या साहय्याने मांडलेली आहे.

लिपचा यांनी याबाबत ‘आवर्तन पवई’शी बोलताना सांगितले, “मी गेली अनेक वर्ष नगरसेवक, पालिका कार्यालय, आमदार खासदार, यांच्याकडे अनेक समस्या घेऊन जात आहे, मात्र त्याचे निवारण होत नाही आहे. मी मांडलेल्या सर्व समस्या या प्रत्येक पवईकराच्या आहेत. शौचालयाच्या आंदोलनात तर आमच्यावर गुन्हे दाखल होवून अटक सुद्धा झाली. राजकीय प्रतिनिधी म्हणून मी अनेक मार्गाने त्यांना समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांच्यावर कोणताही परिणाम होताना दिसत नाही, तेव्हा जाहिररित्या आपल्या समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचाव्यात म्हणून कार्टून बॅनरचा वापर करायचे  ठरवले आणि आज पवईच्या अनेक प्रमुख रस्त्यांवर आणि चौकात हे बॅनर लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी एक पवईकर म्हणून लावलेले आहेत.”

ते पुढे म्हणाले “महत्वाचे हा सगळा खटाटोप मला निवडणुकीत उभे राहयचे आहे म्हणून नाही, मला निवडणूक लढवायची नाही. हे सगळे फक्त एक नागरिक या नात्याने पवईकरांच्या समस्यांचे निवारण व्हावे म्हणून करत आहे.”

अमरदीप आठवले यांनी याबाबत बोलताना सांगितले, “आम्ही पक्ष प्रतिनिधी म्हणून २००७ पासून अनेक प्रश्नांचा पाठपुरावा करतोय, मात्र प्रश्न जसेच्या तसे आहेत. लोकप्रतिनिधी आम्ही विचारात असलेल्या ‘पवई प्रेस’ सारख्या माध्यमात नाहीत, असे त्यांच्या प्रतिनिधीचे म्हणणे आहे. लिपचा यांनी पक्षाच्या माध्यमातून नव्हे, तर पवईकर म्हणून जाहिररित्या आणि प्रतिनिधींच्या निदर्शनास येईल अशा पद्दतीने पवईकरांच्या समस्या मांडलेल्या आहेत. यावर त्यांनी आता तरी उत्तर द्यावे.”

   

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!