पवईकरांसाठी मोफत वैद्यकीय चिकित्सा व आरोग्य शिबीर

docविवारी सुट्टीचा दिवस साधत देवनायक आचार्य बिपीन शांतीलाल शाह मेमोरिअल ट्रस्ट तर्फे व सुखशांती हॉस्पिटल आणि एस बी नर्सिग होम यांच्या संयुक्त सहकार्याने, पवई इंग्लिश हायस्कूल, आयआयटी येथे पवईकरांसाठी मोफत वैद्यकीय चिकित्सा व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते ६ वेळेत हे शिबीर तमाम पवईकरांसाठी खुले असणार आहे. खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील राऊत, नगरसेवक चंदन शर्मा तसेच विभागाचे पोलीस उपायुक्त विनायक देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून या शिबिरास उपस्थित राहणार आहेत.

निसर्ग कधी ऊन, कधी पाऊस, तर कधी थंडी असे वेगवेगळे रंग दररोज दाखवत असल्यामुळे त्याचा समतोल बिघडला आहे हे स्पष्ट आहे. मात्र या बिघडलेल्या समतोलामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम दिसू लागले असून, अनेक मुंबईकर विविध आजाराने त्रस्त आहेत. ज्यांच्याजवळ पैसा आहे ते योग्य वेळी योग्य उपचार आणि तपासण्या करून आपले आरोग्याची काळजी घेत आहेत, परंतु ७ लाखाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या पवईमध्ये अनेक पवईकर असे आहेत जे रोजंदारीवर काम करून आपले पोट भरतात. त्यांना तपासण्या करून घेणे किंवा वेळच्या वेळी औषधोपचार घेणे शक्य नसते, अशा लोकांना समोर ठेवून तसेच अनेक आजारांच्या तपासण्या एकाच ठिकाणी व्हाव्यात या हेतूने रविवारी (उद्या) पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये मोफत वैद्यकीय चिकित्सा व आरोग्य शिबीराचे आयोजन केले गेले आहे.

करण्यात येणाऱ्या विविध तपासण्या:

नेत्रचिकित्सा, त्वचारोग चिकित्सा, बालरोग चिकित्सा, हृदयरोग चिकित्सा, महिला आरोग्य, मधुमेह, मलेरिया, लेप्टो, डेंगू, कावीळ, जुलाब, उलट्या, खोकला आणि साथीचे आजार.

शिबिरातील वैशिष्ट्ये:

विविध आजारांचे तज्ञ, अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला. आवश्यकतेनुसार पुढील आजारांची सुविधा. विशिष्ट आजारांवर माहिती, समुपदेशन व लोकशिक्षण. सर्वांसाठी मोफत औषधांचे वितरण.

अधिक माहितीसाठी अमोल चव्हाण ९७६९०२७९९८, विजय यादव ७६६६६४६६४३, महेश देडे ९७६८६६७०३९, ललिता गोसाई ९९३०६५४८४० यांच्याशी संपर्क साधावा.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!