पवईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा

Hiranandanicha raja

हिरानंदानीचा राजा

nisarg rakshan

पवईचा सम्राट

“हिरानंदानीचा राजा” – तेजस्विनी महिला सेवा संस्था आणि हिरानंदानी ग्रुपच्या वतीने संस्कृती जपण्याचे काम या गणेशोत्सवाच्या निमित्ताने केले गेले आहे. देखाव्यातून दुर्ग-किल्ले यांची महाराष्ट्राला लाभलेली अद्वितीय संपदा दाखवण्याचा प्रयत्न व त्यांची जपणूक याबद्दल संदेश दिला गेला आहे. किल्यामध्ये विराजमान असणाऱ्या बाप्पारुपी राजाच्या सेवेत असणारा मूषक वाद्यवृंद खूप उत्तमरित्या सादर केला आहे.

“पवईचा सम्राट” – स्टार मित्र मंडळाच्यावतीने गौतमनगर परिसरात बाहुबली रूपातील मूर्ती स्थापित केली गेली आहे. देखाव्यात झाडे लावा-झाडे जगवा, पाणी वाचवा, झाडे तोडू नका अशा प्रकारचे संदेश देणारे फलक लावून मंडळाच्या वतीने यावर्षी लोकांच्यात पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देण्याचे काम केले गेले आहे.

Kala Vikas Mandal

कला विकास सार्वजनिक गणेशोत्सव

कला विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने तिरंदाज गावठाण येथे महालामध्ये विराजमान अशी बाप्पांची मनमोहक मूर्ती स्थापित केली आहे. मंडळातर्फे पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील दुष्काळाची भीषण परिस्थिती व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी देखाव्यातून प्रबोधन केले गेले आहे. मंडळातर्फे भाविकांना दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्याचे आव्हान केले गेले असून स्वतः मंडळ स्वनिधीतून एक ठराविक रक्कम या निधीसाठी देणार आहे.

Powaicha Shree

पवईचा श्री

“पवईचा श्री” – नवदुर्गा मित्र मंडळाच्यावतीने मा. रमाबाई आंबेडकर नगर, ग्रूप न.१ येथे पवईच्या श्रींची स्थापना केली गेली आहे. मंडळाने सोशल मीडीयाचे फायदे-तोटे हा विषय घेऊन प्रबोधन करणाऱ्या खूप चांगला प्रयत्न केला आहे. सध्याच्या काळात प्रत्येक तंत्रज्ञानाचा विघातक वापर वाढत असताना, आपण सोशल मिडीयाचा वापर चांगल्या प्रकारे कसा करु शकतो हा संदेश उत्तमरित्या देण्याचे काम या मंडळातर्फे केले गेले आहे.

Powai Cha Raja1

पवईचा राजा

“पवईचा राजा” – युवा मित्र मंडळतर्फे, चैतन्यनगर भाजीमार्केट मधील परिसरात राजाची स्थापना केली गेली आहे. मंडळाने मोबाईल एक समस्या कशी झाली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपल्या देखाव्यातून केला आहे. मोबाईलचा अतिवापर व लोकांना नको नको त्या ठिकाणी फोन आल्याने कसे अवघडल्या सारखे होते, याची उदाहरणे त्यांनी देखाव्यातून मांडली आहेत.

powaicha Maharaja

पवईचा महाराजा

“पवईचा महाराजा” – पवई विकास मंडळातर्फे महाराजाची स्थापना आयआयटी मार्केट गेट येथे केली गेली आहे. मंडळाने कालिका मातेचा महिमा आपल्या देखाव्यातून मांडला आहे. हलत्या चित्राच्या माध्यमातून आणि त्यास आवाजाची संगत देवून मातेचे रूप आणि तिच्या माहितीचे वर्णन खूप सुंदर रित्या केले गेले आहे. अंधाऱ्या गुफेत प्रवेश करताना थोडेसे भीतीदायक वाटत असले तरी मातेची महती ऐकल्यावर भक्त प्रसन्न मनाने बाहेर येतो.

navsacha raja

पवईचा किंग आणि नवसाचा राजा

“पवईचा किंग” – किंग स्टार मित्र मंडळाच्यावतीने पद्मावती हॉस्पिटल जवळ हिमालयाची प्रतिकृती बनवून त्यात बाप्पाला स्थापित केले आहे.

“नवसाचा राजा” – तरुण मित्र मंडळ, गोखलेनगरमध्ये हा राजा स्थापित केला आहे. या मंडळाने सर्व देव एक असल्याचा संदेश हलत्या पुतळ्यांच्या देखाव्यातून दिला आहे. नवसाला पावणारा राजा अशी सुद्धा या बाप्पाची महती आहे.

saigalvadi

सेव्हन स्टार मित्र मंडळ, पवई युथ कॉंग्रेसचा राजा आणि बाल मित्र मंडळ, सायगलवाडीचे बाप्पा

सेव्हन स्टार मित्र मंडळ, गोखलेनगर येथे लहानग्यांनी एकत्रित येवून हा गणेशोत्सव साजरा केला गेला आहे. गुफेमध्ये बाप्पाची स्थापना केली गेली आहे.

पवई युथ कॉंग्रेसचा राजा, गोखलेनगर – संस्कृती जपत या मंडळातर्फे लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

बाल मित्र मंडळ, सायगलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव – पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे.

ganeshnagar

गणेशनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेशनगर (पंचकुटीर)

गणेशनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेशनगर (पंचकुटीर) – गणेशनगर येथील गणेश मंदिराच्या प्रांगणात या बाप्पाची स्थापना केली गेली आहे. देखाव्यातून आपले घर, आपला परिसर आणि देश स्वच्छ ठेवण्याचा संदेश या मंडळातर्फे देण्यात आलेला आहे. गणेशनगर गणेश मंदिराची महतीही पूर्वीपासूनच आहे, त्यामुळे या मंदिरात गणोशोत्सव काळात स्थापित केल्या जाणाऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी ११ दिवस भाविकांची मोठी गर्दी असते.

मोरारजी नगरचा राजा व जयभीम नगरचा राजा

मोरारजी नगरचा राजा व जयभीम नगरचा राजा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!