पवईत तोतया पोलिसाला अटक

तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा आहे आणि आम्ही तुला अटक करायला आलो आहोत” असे सांगून, खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तोतया पोलिसांच्या दुकलीतील एकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. विजय तटकरे असे अटक आरोपीचे नाव असून, अशाच प्रकारच्या एका प्रकरणात १२ वर्षापूर्वी साकीनाका पोलिसांनीही त्याला अटक केली होती.

एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणारे पंचेचाळीस वर्षीय ओव्हाळ (बदललेले नाव) हे रविवारी १२.३० वाजता हिरानंदानी येथील एस एम शेट्टी शाळेजवळून जात असताना खाकी कपडे घातलेल्या दोन इसमांनी त्यांना रस्त्यात अडवले. ‘पोलीस असल्याची सांगून “तुम्ही लॉजमध्ये नेऊन एका महिलेचा बलात्कार केल्याची तक्रार आम्हाला मिळाली आहे. आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत” असे सांगताच तक्रारदारांनी तुम्ही ओळखण्यात चूक करत आहात असे त्यांना सांगितले. मात्र ते जबरदस्ती त्याला रिक्षात टाकून ऐरोली येथे घेवून गेले आणि तिथे त्याच्याकडून एटीएममधून जबरदस्ती सात हजार रुपये काढून घेतले. अटक टाळण्यासाठी लवकरच आणखी पैसे द्यावे लागतील असे सांगून त्याला सोडून दिले, असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

याबाबत ओव्हाळ यांनी पवई पोलिसात तक्रार दाखल करून उर्वरित रक्कम देण्यासाठी गांधीनगर येथे बोलावले असल्याचे सांगितले.

पवई पोलिसांनी गांधीनगर येथे साध्या वेशात त्याला पकडण्यासाठी सापळा लावला, परंतु त्यांनी जागा बदलत आयआयटी येथे येण्यास सांगितले. तिथूनही जागा बदलत नवीन ठिकाणी पैसे घेण्यासाठी आलेल्या तटकरे याला अखेर पवई पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याचा अजून एक साथीदार गोविंद चव्हाण संधी मिळताच तिथून पसार झाला.

भादवि कलम १७०, ३३८, ३८९ गुन्हा नोंद करून कोर्टात हजर केले असता प्रथम पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. २००५ साली तटकरेला भादवि कलम १७०, ४२० नुसार साकीनाका पोलीसांनीही अटक केली होती.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!