पवई इंग्लिश हायस्कूलने साजरा केला ‘योगा डे’

योगामुळे विद्यार्थ्यांचे मन स्वस्थ व तणावमुक्त राहल्याने त्याचा लाभ त्यांना अभ्यासात होत असल्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देत शाळेत बुधवारी जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या निवेदिता यांनी यावेळी विद्यार्थ्यांना तणावमुक्त करणाऱ्या योगाचे मार्गदर्शन केले.

पहाटे आईच्या कुशीतून उठून आलेल्या पूर्व-प्राथमिकच्या चिमुकल्यांसह समजदारीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या माध्यमिकच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी या शालेय उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.

विद्यार्थी वर्ग अभ्यासाच्या तणावात असल्याची अनेक उदाहरणे दिवसेंदिवस समोर येत आहेत. या तणावाखाली अनेक मुले वाम मार्गाला जातात, तर काही मुले जिवाचा खेळ करून बसतात. अनेकवेळा घरात आणि आसपास असणाऱ्या वातावरणामुळे सुद्धा मुले तणावात असतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर पडतो. आमच्या शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी योगासने महत्वाची भूमिका बजावतात हे सांगतानाच, निरोगी आणि सदृढ राहण्यासही  मदत करतात हे पटवून देण्यासाठी योगा डेचे औचित्य साधत ‘योगा फॉर हार्मोनि एंड पिस’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे यावेळी बोलताना शाळेच्या प्रशासनाने सांगितले.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!