पवई तलावावर मगरींसोबत आता अजगरांचेही साम्राज्य

शनिवारी पकडण्यात आलेला अजगर

शनिवारी पकडण्यात आलेला अजगर

वई तलाव भागात आता मगरीं सोबतच विविध जातीच्या साप आणि अजगरांचे साम्राज्य उभे होत आहे. गेल्या महिनाभरात पवई तलाव भागात किनाऱ्यावर अनेक मोठमोठाले अजगर रोडवर अथवा पदपथावर येऊ लागल्याने आता या भागात यांचे पण साम्राज्य असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र पवई तलाव भागात स्वच्छता मोहिम चालू असल्याने आता या अजगरांना लपण्यास जागा न उरल्याने ते रस्त्यावर येऊ लागले आहेत व त्यांना आश्रयाची ठिकाणे मिळताच हे सर्व थांबेल असे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.

पवई तलावात मगरींचे साम्राज्य असून, त्यांच्याकडून तलावात उतरलेल्या लोकांवर प्राणघातक हल्ले झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तलाव भागातील काही विशिष्ट ठिकाणी खडकांवर या मगरी उन्हाचा आस्वाद घेताना नजरेस पडतात. या काळात मासेमारी करणारा एखादा व्यक्ती पाण्यात उतरला कि, मगरींकडून त्यांच्यावर हल्ला केला जातो. या कारणामुळे अनेक मासेमारी करणाऱ्या लोकांनी आपली ठिकाणे बदलेली आहेत, परंतु एका संकटातून सुटलेल्या मुंबईकरांना पवई तलावावर आता एका नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिनाभरापासून या भागात साप आणि मोठमोठाले अजगर निघण्याचे प्रकार वाढलेले आहेत. गेल्या आठवड्यातच निसर्ग उद्यान भागात संध्याकाळच्या वेळेस एक अजगर रस्त्यावर जात असताना काही नागरिकांच्या दृष्टीस पडला होते, ज्यास प्राणीमित्रांच्या साहय्याने पकडून जंगलात सोडून देण्यात आले होते.

शनिवारी सकाळी पुन्हा पवई विहार समोरील तलाव भागात एक १० फुटी अजगर मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकून जखमी होऊन पदपथावर आले होते. लोकांच्या नजरेस पडताच चालण्यासाठी आलेल्या अनेकांची धावपळ उडाली होती. सुदैवाने मासेमारीसाठी आलेला भुट्यां नामक इसमाने त्यास पकडून गणेशनगर गणेशघाट भागात जंगलात सोडून दिले.

वारंवार घडणाऱ्या या अशा घटनांमुळे तलाव भागात येणाऱ्या लोकांच्यावर धोक्याचे सावट असून त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राणीमित्र संस्था पॉज मुंबईचे सुनिष कुंजू यांनी आवर्तन पवईशी याबाबत बोलताना सांगितले, ‘पवई तलाव आणि आसपासचा हिरवळीच्या भागात पहिल्यापासूनच अशा जनावरांचे वास्तव्य आहे, हे नवखे नाही. सध्या तलाव भागात घाण, वनस्पती काढण्याचे काम चालू आहे, ज्यामुळे त्यांची आश्रयाची ठिकाणे नष्ट होत असल्याने ते जनमानसात येऊ लागली आहेत. काम थांबताच आणि त्यांना आश्रयाची ठिकाणे मिळताच हे सर्व थांबेल. तो पर्यंत आम्हास थोडे जागरूक आणि काळजीपूर्वक राहणे आवश्यक आहे.

साप, मगर किंवा तत्सम कोणतेही जनावर रोडवर किंवा रहदारीच्या ठिकाणी आलेले दिसताच घाबरून न जाता व त्यांना कोणतीही हानी न पोहचवता, सुरक्षित अंतरावरून त्यांच्यावर नजर ठेवून प्राणीमित्र संघटनेला ९८३३४८०३८८ या क्रमांकावर माहिती देवून, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत करावी.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!