पवई तलाव स्वच्छता मोहिमेला अखेर सुरुवात

स्थानिक आणि पर्यावरण प्रेमींनी कडक विरोध दर्शवला असतानाही, अखेर पवई तलाव स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे

powai lake cleaningवई तलावाची दिवसेंदिवस होत चाललेली दुर्दशा सावरण्याचा खटाटोप करणाऱ्या पालिका प्रशासनाने अखेर त्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. ७.१५ करोड खर्च करून पवई तलाव स्वच्छता आणि ५ वर्ष त्याच्या देखभालीचे काम किंजल कंस्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले असून, तलाव स्वच्छता मोहिमेला अखेर सुरुवात झाली आहे.

पवई तलाव आणि परिसर सुशोभिकरणासाठी आजवर जवळपास १०० करोड रुपये खर्च केल्यानंतरही, ‘जैसे थे’ असणाऱ्या परिस्थितीला सावरण्यासाठी, सांडपाणी, कचरा, टाकाऊ पदार्थामुळे प्रदूषित झालेला पवई तलाव पुन्हा एकदा चकाचक करण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे. यासाठी ७.१५ करोड रुपये खर्च ही मंजूर करण्यात आलेला आहे.

प्रत्येक वर्षी तलाव स्वच्छता, गाळ काढणे, डागडूजी, सौंदर्यकरण अशा वेगवेगळ्या प्रकल्पांच्या अतंर्गत मंजुरी मिळवून आपले खिसे गरम करणाऱ्या पालिका प्रशासनाचा हा सगळा खटाटोप पुन्हा आपले खिसे भरण्यासाठी तर नाही ना? असे पर्यावरण प्रेमींनी यावेळी बोलताना सांगितले.

पवई तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत पालिका प्रशासन बिघडत चाललेल्या पवई तलावाच्या परिस्थितीला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु पालिका प्रशासन प्रत्येक काही वर्षांनी करोडो रुपये मंजूर करून घेऊन काम कमी आणि आपले खिसे गरम करण्यात जास्त पुढे असते. हा प्रकल्प सुद्धा त्यांचे खिसे भरण्यासाठीच आहे, असा आरोप स्थानिक आणि पर्यावरण प्रेमीनी करत याला पूर्ण विरोध दर्शवला होता, परंतु अखेर हा विरोध मोडीत काढीत पालिका प्रशासनातर्फे स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झालेली आहे.

पालिका हायड्रोलिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले कि, “तलावातील जलपर्णी काढणे, तलावातील घाण हटवणे आणि किनाऱ्यावरील स्वच्छतेचे काम या रकमेतून केले जाणार आहे. याचे काम मिळालेल्या संस्थेला पुढील ५ वर्ष या कामाच्या देखभालीची जबाबदारी सुद्धा पार पाडावी लागणार आहे. याचा संबंध कुठल्याही दुसऱ्या प्रकल्पांशी जोडून याला रोखण्याचे काम केले जात आहे, परंतु या स्वच्छता उपक्रमांतर्गत तलावाची ढासळत चाललेली स्थिती सुधारण्यास मदतच होणार आहे.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!