पवई बंद ! भिमसैनिकांचा पवईत रास्ता रोको

भीमा कोरेगाव येथे विजय दिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या लोकांवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ मुंबईत आज ठिकठिकाणी भीमसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पवईमध्ये सुद्धा भीमसैनिकांनी आदीशंकराचार्य मार्गावर उतरून रास्तारोको केले.

१ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे २०० वा विजय दिवस साजरा करण्यासाठी पोहचलेल्या लोकांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. याचेच पडसाद हळूहळू शहरांमध्ये उमटू लागल्याने पवईमधील एल अंड टी परिसरात काल संध्याकाळी भिमसैनिकांनी रास्तारोको करत आपला निषेध व्यक्त केला होता. यावेळी पोलिसांनी येथील काही आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन मोडीत काढले होते.

मंगळवारी पुन्हा भीम सैनिकांनी रस्त्यावर उतरत आदि शंकराचार्य मार्गावर आयआयटी मेनगेट येथे रस्त्यावर ठिया मांडून रस्ता रोको केले होते. हळूहळू हे लोन संपूर्ण पवई आणि चांदिवली परिसरात पसरत संघर्षनगर, चांदिवली, फिल्टरपाडा, आयआयटी परिसरातील भिम अनुयायांनी रस्त्यावर उतरून संपूर्ण परिसर जाम करून टाकला.

रोडवर उतरलेल्या आंदोलकांमुळे जेव्हीएलआरवर बराच काळ चक्काजाम झाला  होता. आंदोलकांनी पवई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत येथील वरिष्ठांना आपल्या मागण्याचे निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनाचा वाढता लोंढा पाहता पवईतील बऱ्याच ठिकाणी दुकाने सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवईमध्ये हे लोन असेच पसरत राहणार असून, उद्या (बुधवारी) सुद्धा पवई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!