आयआयटी येथील मारुती मंदिरावर कारवाईची टांगती तलवार

आयआयटी येथील मारुती मंदिर वाचवण्यासाठी भक्तगणांनी आंदोलन, सह्याची मोहीम, अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी असे सर्वोतोपरी खटाटोप करूनही मारुती मंदिराच्या निष्काशनाची टांगती तलवार अजूनही लटकत आहे. गेल्या आठवड्यात पालिकेतर्फे या मंदिराला हटण्यासाठीची दुसरी नोटीस मंदिर मालकांना देण्यात आली आहे.

आदि शंकराचार्य मार्गावर (जोगेश्वरी – विक्रोळी लिंक) गेल्या ९२ वर्षापासून उभ्या असणाऱ्या मारुती (हनुमान) मंदिराला पिटीशन फॉर लिव्ह टू सिव्हीलच्या सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचा व महाराष्ट्र शासनाचा ०४.१०.२०१० रोजी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या पारित करण्यात आलेल्या आदेशाचा हवाला देत पालिकेच्या एस विभागातर्फे ०६ एप्रिलला मंदिर प्रशासनाला ७ दिवसाच्या आत मंदिर काढण्यात यावे, अन्यथा निष्कासनाची कारवाई करण्यात येईल अशा आशयाची नोटीस बजावली होती. ज्यानंतर पवईकर व भक्तगणांनी रस्त्यावर उतरत याचा निषेध केला होता.

पुढे भक्तगणांनी एकत्रित येत पवई मारुती मंदिर बचाव समिती स्थापित करत मंदिर वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु करून सह्यांची मोहीम, पालिका अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, मुदतवाढ मागून आणि मंदिर परिसराला सुरक्षा देत ही कारवाई रोखण्याची धावपळ सुरु केली होती. नगरसेवकांनी महापौर आणि पालिका आयुक्त यांच्या सोबत मंदिरावर होणारी कारवाई रोखण्यासाठी चर्चा केली होती. मात्र ८ मे रोजी पुन्हा जुन्या नोटीसीचा संदर्भ देत पालिका ‘एस’ विभागातर्फे अजून एक नोटीस मंदिर मालक ह. श्री. परांजपे यांच्या नावे देण्यात आली असून, दोन दिवसात मंदिर काढण्यात यावे अन्यथा निष्कासनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

सदर मंदिर ज्या भुखंडावर स्थित आहे तो भूखंड महापालिकेने पीछेहाटीचा भूभाग (land setback) अंतर्गत ०६/०१/१९९५ रोजी मनपाने ताब्यात घेतला असून, उर्वरित भूखंडाचा भागावर विकासकाने प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता (इमारत व प्रस्ताव) पू.उ. यांनी IOD देतेवेळी land setback वर अस्तित्वात असलेले हनुमान मंदिर हे विकसित करण्यात येणाऱ्या इमारतीच्या तळमजल्यावर इमारतीचा ताबा घेण्यापूर्वी स्थलांतरित करण्यात यावे असे नमुद केले आहे. त्यानुसार विकासकाने सदर भूखंडावर ‘मारुती दर्शन’ या इमारतीच्या आवारात सदर हनुमान मंदिरासाठी नवीन मंदिर बांधून दिले आहे. आपणास या विभागाच्या पत्र क्र. सआएस/ओडी/५३/सअ (परि.) दि. ०६/०४/२०१७ अन्वये सदर मंदिर काढण्याकरिता ७ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्या अनुषंगाने आपले दिनांक १०/०४/२०१७ रोजीचे पत्र या विभागास प्राप्त झाले. सदर पत्रात आपण २० दिवसांकरिता मुदत मागितली होती. आपण आजतागत सदर हनुमान मंदिर स्थलांतरित करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सदर हनुमान मंदिर काढण्याकरिता या विभागाने आपणास वेळोवेळी सूचित केलेले असून अद्यापही आपण सदर मंदिर आदि शंकराचार्य मार्गावरून काढले नाही. यास्तव आपणास या पत्रान्वये सूचित करण्यात येते की, ०२ दिवसात सदर प्रस्तावित हनुमान मंदिर काढण्यात यावे अन्यथा या विभागामार्फत सदर मंदिरावर निष्कासनाची कार्यवाही करण्यात येईल. अशा आदेशाची नोटीस कार्यकारी अभियंता ‘एस’ विभाग यांच्या सहिनुसार मंदिर मालकांना देण्यात आली आहे.

या पत्रानंतर एवढे दिवस मंदिर वाचवण्यासाठी पळणारी भक्तमंडळी थंडावलेली दिसत असून, याला वाचवण्यासाठी प्रयत्न आता कमी होताना दिसू लागले आहेत. मंदिर मालकांनी छुप्या पद्दतीने आपल्या भक्तगणांना ‘राजकीय पक्षांना आंदोलन करण्यास सांगावे’ अशा आशयाच्या दिलेल्या पत्रावर सुद्धा भक्तगण आणि राजकीय पक्षांची काहीच हालचाल दिसत नसल्याने आता हे मंदिर येथून हटवले जावे अशीच सर्वांची इच्छा असल्याचे समोर येत आहे.

, , , , , , , , , , , , , ,

2 Responses to आयआयटी येथील मारुती मंदिरावर कारवाईची टांगती तलवार

  1. Rahul May 28, 2017 at 6:58 pm #

    Sarwanchi icha manje konachi icha te sanga bhaktani bolaa kaye mandir kada bolaa tar koni bolaa he dakhawa

    • आवर्तन पवई June 7, 2017 at 6:26 am #

      मंदिर बचाव समितीशी चर्चा करा तुम्हाला उत्तर मिळेल.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!