पोलीस असल्याचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

व्या नोटांच्या बदल्यात अधिक किंमतीच्या जुना नोटा देवून फायदा करून देण्याच्या बहाण्याने बोलावून, पोलीस असल्याची बतावणी करून सुनील तांबे (२६) या व्यावसायिकाची फसवणूक करून पळ काढलेल्या टोळीच्या म्होरक्याच्या गुरुवारी साकीनाका पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जाफर सय्यद (२४) असे अटक आरोपीचे नाव असून, साकीनाका पोलीस त्याच्या इतर साथिदारांचा शोध घेत आहेत.

अचानक ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्याने अनेकांची त्रेधा तिरपिट उडाली होती. अशात अनेकांनी नोट बदलीच्या धंद्यात आपल्या पोळ्या शेकत चांगलाच फायदा करून घेतला. अंधेरी येथील रहिवाशी तांबे यांना सुद्धा सय्यदने अशीच काहीशी आस दाखवत १२ लाखाच्या नव्या नोटांच्या बदल्यात १४ लाख किंमतीच्या नोटा देण्याची आशा दिली होती.

२ लाखाचा एकदम फायदा पाहता तांबे यांनी आपल्या मित्रपरिवारातील ६ – ७ व्यक्तींकडून मिळून १२ लाखाची व्यवस्था करून जाफर याला बंदोबस्त झाल्याचे कळवले.

“३ डिसेंबरला माझ्याकडे पैसे तयार असल्याचे कळवल्यावर सय्यद याने पैशांच्या देवाणघेवाणकरिता मला साकीनाका जंक्शन येथे बोलावले होते. तिथे त्याने एक व्यक्तीशी ओळख करून देवून पैसे त्याला देण्यास सांगितले. त्या व्यक्तीने माझ्याकडून पैसे घेवून मला त्याच्याकडील पैसे आणून देतो असे सांगून तिथेच रस्त्याच्या कडेला उभे राहण्यास सांगितले. काही वेळातच एका गाडीतून काही लोक तिथे आले आणि एखादा छापा पडावा तसे काहीशी हालचाल सुरु झाली. पोलीस – पोलीस केल्याने आम्ही तिथून निघून गेलो मात्र सय्यदच्या त्या मित्राने पैसे परत आणून दिलेच नाहीत आणि सय्यदही गायब झाला होता” असे तांबे यांनी आपल्या जवाबात म्हटले आहे.

संपूर्ण रात्र वाट बघूनही कोणीच आले नाही तेव्हा तांबे यांना फसवणूक झाले असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली.

“सय्यद याने आपल्या मित्रांसोबत हा सारा बनाव आखल्याचे कबूल केले आहे. आम्ही घटनास्थळाच्या जवळ असणाऱ्या सिसिटीव्हीचे फुटेज सुद्धा मागवले असून, संपूर्ण घटनाक्रम पडताळून पाहत आहोत”, असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना साकीनाका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

साकीनाका पोलिसांनी भादवि कलम १७० (पोलीस असल्याची बतावणी करणे), ४२० (फसवणूक), ३४ (गुन्ह्याच्या इराद्याने केलेले सामायिक कृत्य) नुसार गुन्हा नोंद करून कोर्टात हजर केले असता त्याला २१ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!