प्रबोधनकार ठाकरे जयंती निमित्त पवईत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

vsरिवर्तनवादी विचारवंत मा. प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३० व्या जयंती निमित्त आयआयटी, पवई येथे धम्मदिप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ सप्टेंबर २०१५ रोजी संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत पवईतील तिरंदाज महानगरपालिका शाळेत प्रबोधनकार ठाकरे आणि परिवर्तनवादी विचार’ या विषयावर ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे.

पवईतील जनतेसाठी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असणारी व लोकांमध्ये जागरूकता  निर्माण करूनच आपण एक चांगला समाज घडवू शकतो, या विचाराने चालणाऱ्या धम्मदिप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनच्या वतीने नेहमीच समाज प्रबोधनासाठी विविध कार्याक्रमांचे आयोजन केले जाते.

१७ सप्टेंबर, परिवर्तनवादी विचारवंत मा. प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधत प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे परिवर्तनवादी विचार जनमाणसात पोहचावे आणि बालमनात रुजावेत म्हणून या संस्थेतर्फे आयआयटी, पवई येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

स्पर्धेत शालेय विद्यार्थी आणि युवकांनी भरभरून सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी जितेंद्र धिवार ९६१९९९५११६, रविराज शिंदे ९९३०४६८६०३, महेश देडे ९७६८६६७०३९ यांच्याकडे संपर्क साधावा.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!