प्रशासनाला आली जाग, रमाबाई नगरचा मलबा झाला साफ

ramabai kachra cleaning आयआयटीमधील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात, गेली अनेक दिवस बांधकाम व्यावसायिक आणि कामगार, यांनी उरलेला मलबा टाकून परिसरात घाण पसरवली होती. कचऱ्यामुळे स्थानिकांना येणे जाणे तर मुश्कील झालेच होते; परंतु आजार पसरून परिसरातील लहान मुले आणि जेष्ठ नागरिक जुलाब, ताप या सारख्या आजाराने त्रस्त झाले आहेत. याबाबत निवडून दिलेले प्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाला तक्रारी करून सुद्धा, ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केले जात होता. शेवटी या समस्येला वाचा फोडण्यासाठी, स्थानिकांनी सोशल नेट्वर्किंग साईट्सचा वापर करून, आपली ही समस्या प्रशासनापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न चालू केले. स्थानिक माध्यमांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरल्याने, अखेर रमाबाईकरांना न्याय मिळाला असून सोमवारी महानगरपालिकेतर्फे रमाबाई परिसरातील मलबा हटवण्यात आलेला आहे.

ramabai story Screenshotरमाबाई आंबेडकर नगर भाग २ मध्ये गेली अनेक दिवस कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले होते. त्यात भर म्हणून कि काय, बांधकाम करणारे व्यावसाईक आणि कामगार निघालेला टाकाऊ मलबासुद्धा इथेच आणून टाकत होते. त्यामुळे तिथे मलब्याचे डोंगर तयार झाले होते. याबाबत महानगरपालिका प्रशासन, स्थानिक नगरसेवक, आमदार यांना वारंवार तक्रारी दिल्या गेल्या होत्या; परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नव्हती. हे पाहता काही स्थानिक तरुणांनी मिळून सोशल नेट्वर्किंग साईट्सच्या माध्यमातून संबंधित समस्या स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनापर्यंत पोहचवण्याची मोहीम हाती घेतली. avartanpowai.info ने शनिवारी रमाबाई नगरला आजाराचा विळखा, स्थानिक प्रतिनिधीं कानाडोळा करत असल्याचा स्थानिकांचा आरोप या मथळ्याखाली बातमी करून स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनासमोर समस्या आणली होती. याची दाखल घेत सोमवारी परिसरातील मलबा हटवण्याचे काम महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

एस वार्ड अधिकारी नलावडे यांनी या बाबत avartanpowai.info शी बोलताना सांगितले “आम्ही पंचनामा करून स्थानिक भागात काम करणाऱ्या आणि इथे मलबा टाकणाऱ्या ४ बांधकाम ठेकेदारांवर कारवाई केली आहे. इथला मलबा ट्रूक आणि जेसीबीच्या सहाय्याने साफ करण्यात आला आहे. तसेच पुन्हा मलबा टाकल्यास कडक कारवाई करण्याची कडक ताकीद सुद्धा संबंधित ठेकेदारांना देण्यात आली आहे.

, , , , , , , , , , , , ,

One Response to प्रशासनाला आली जाग, रमाबाई नगरचा मलबा झाला साफ

  1. santosh b salbe June 24, 2015 at 4:03 pm #

    Thanks awartan for u r support without u r support it could’t possible. Big big thanks from bottom of the heart.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!