प्राणी मित्र सुनिष सुब्रमण्यम कुंजू यांना ‘बिल्ड इंडिया’ पुरस्कार प्रदान

IMG-20151123-WA0007प्राणी हक्क कार्यकर्ता आणि प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी – मुंबई  व एनव्हीरो केअर वेलफेयर सोसायटीचे संस्थापक मा. श्री. सुनिष सुब्रमण्यनम कुंजू यांना नवी दिल्ली येथे आयोजित एकविसाव्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक समारोह २०१५ मध्ये ‘बिल्ड इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, भरात देशाला विविध क्षेत्रात मनाचे स्थान मिळवून देणाऱ्या व्यक्तींना भारत निर्माण या संस्थेतर्फे या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

कुंजू हे गेली २० वर्षे प्राणी हक्क संरक्षण व बचाव, निसर्ग रक्षण तसेच प्राणी हक्क कायद्याच्या निर्मितीत मोलाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या कल्याणकारी कार्याचा गौरव म्हणून दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!