फुलेनगरमध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक

crimeक रुपया देण्याचे आमिष दाखवून, पवईमधील फुलेनगर भागात राहणाऱ्या एका ५४ वर्षीय क्रूरकर्म्याने, आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी घडली आहे. या प्रकरणी क्रूरकर्म करणारा अशोक चाळके यास पवई पोलिसांनी अटक केली असून, वैद्यकीय तपासणी करून उद्या न्यायालयात सादर केले जाणार आहे.

पिडीत मुलगी ही आपल्या आई वडिलांसह आयआयटी येथील फुलेनगर भागात राहते. तिचे वडील पेंटरचे काम करतात तर आई घरकाम करते. सोमवारी रात्री १० वाजता ती आपल्या घरासमोरील मैदानात खेळत असताना, आरोपीने तिला एक रुपया देण्याचे आमिष दाखवले आणि आपल्या घरी घेऊन जावून तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केला.

“घरकामात गुंतलेली पिडीत मुलीची आई जेव्हा मुलीला शोधत आली, तेव्हा तिला आरोपीच्या घरातून बाहेर निघताना पाहून, तिने मुलीला तू तिकडे काय करत असल्याचे विचारले असता, तिने तिच्या सोबत घडलेली सर्व हकीकत आईला सांगितली. ज्यानंतर तिच्या आईने आपल्या पतीस सर्व हकीकत कथन केली व मंगळवारी पवई पोलीस ठाण्यात पालकांनी आरोपीने पोरीला रागाने पाहिले अशी एक एनसी दाखल केली. मात्र याबाबत स्थानिकांना माहिती मिळताच, मुलीच्या आई वडिलांना धीर देवून मंगळवारी मध्यरात्री मुलीवर झालेल्या अत्याचाराची तक्रार नोंद करण्यात आली” असे आवर्तन पवईशी बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

“सदर गुन्ह्यात भादंवी कलम ३७६, ३७६ (२) आय सह पोस्का कलम ४, ८, १२ नुसार कारवाई करत आरोपी अशोक चाळके याला आम्ही ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणी करून आम्ही त्याला उद्या (गुरुवारी) न्यायालयात सादर करणार आहोत” असे भाई म्हाडेश्वर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवई पोलीस ठाणे यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!