बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाची लूट

बंदूकबीएमडब्ल्यू गाडीतून येऊन चौघांनी पवईतील एका व्यावसायिकाला लुटल्याची हादरवून टाकणारी घटना पवईजवळ घडली आहे. व्यावसायिकाच्या गळ्यातील सोन्याची चैन व २ मोबाईल फोन अशी एक लाखाची लूट या चोरट्यांनी केली आहे. याबाबत ४ अज्ञात इसमां विरोधात पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

पवई येथील व्यावसायिक निलेश डोंगरे (३८) यांनी पार्कसाईट पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार ‘ते आपल्या भावाला विमानतळावर आणायला जात असताना, आयआयटी पवई येथील गांधींनगरकडील उतारावर, पाठीमागून येऊन एक बीएमडब्ल्यू कार त्यांच्या गाडीसमोर उभी राहिली. काही क्षणातच एक व्यक्ती बंदुकीसह गाडीतून खाली उतरून त्यांच्याजवळ आला व डोंगरे यांना बंदुकीचा धाक दाखवून खाली उतरण्यास सांगितले. सोबत असणाऱ्या तीन साथीदारांनी येऊन लोखंडी सळीच्या साहय्याने डोंगरे यांना  मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व दोन मोबाईल अशी १ लाखाची लूट करून ते पळून गेले.’

डोंगरे यांच्यावर कांजूरमार्ग येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांनी याबाबत पार्कसाईट पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली असून, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!