भिमजल्लोष २०१६ ची कार्यकारिणी जाहीर

आयआयटी /  अविनाश हजारे

1हामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीसाठी गठीत झालेल्या “भिमजल्लोष २०१६” ची कार्यकारिणी अखेर जाहीर झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी आयआयटी, महात्मा फुलेनगर येथील पंचशील बुद्ध विहारमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत या कार्यकारिणीचे गठन झाले असून, विभागातील युवा कार्यकर्त्यांवर भिमजल्लोष यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून, विभागातील सर्व आंबेडकरी जनतेला एकसंघ करुन बाबासाहेबांच्या विचारांना अभिप्रेत अशी एकच जयंती करण्यासाठी “भिमजल्लोष २०१६” ची निर्मिती केली गेली आहे.

प्रमुख मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेल्या विभागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या नवीन कार्यकारिणीची घोषणा करताना कार्यकारणीच्या अध्यक्षपदी सतीश शिंदे, कार्याध्यक्षपदी प्रा. सुमेध लोखंडे, उपाध्यक्षपदी अनिल काकडे, जालिंदर ताकवणे, राजीव डाके, उत्तम डोळस, लालू म्हस्के, बाळू पगारे तर सेक्रेटरी म्हणून विलास तुपे, सह-सेक्रेटरीपदी बापू भडके, महेंद्र मुळे, बंडू पंडित, महेश सावंत, राजेश हजारे, प्रवीण खरात, कुलदीप घोडेराव, सुनिल खरात यांची निवड केली आहे.

खजिनदारपदी अनिता भदरगे, सुनिता मगरे, मनीषा सावंत, रत्नमाला बोर्डे, शोभा भगवते, शकुंतला किर्तीकर, वैशाली गजधने, कांता सावंत या महिला ब्रिगेड काम पाहणार आहेत. हिशोब तपासनीस म्हणून प्रा. सुमेध लोखंडे व ज्वोली मोरे हे कार्यभार सांभाळतील.

समन्वयक समितीवर विभागातील ज्येष्ठ नेते दिलीप हजारे, अनिल लोखंडे, पांडुरंग ओव्हाळ, प्रभाकर मोरे, आनंद मोरे, रवि खांडेकर, सर्जेराव गवई, हरिभाऊ वानखेडे, हरिभाऊ जाधव आदी मान्यवर आहेत.

“भिमजल्लोष २०१६” हा विभागातील सर्वांचा आहे. ज्यांना कुणालाही यामध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांना योग्य ती जबाबदारी देवून मान-सन्मान राखला जाईल” असे आवाहन ही यावेळी ‘आवर्तन पवई’शी बोलताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

   

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!