आंदोलन झाले, अटक झाली, कोर्ट कचेरी सुद्धा झाली, पण मुतारी मात्र अजून नाही झाली

लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना न भूलता पवईकर व सर्वपक्षीय कार्यकर्ते लवकरच पूर्वीपेक्षाही  मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

souchalayजोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील पवई उद्यान ते गांधीनगर या पट्यात सार्वजनिक मुतारी बनवण्यासाठी स्थानिक भागातील नागरिक व सर्वपक्षित कार्यकर्त्यांनी मिळून १६ मार्च २०१५ रोजी आयआयटी मेनगेट येथील फुटपाथावर पत्र्याचे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारून शांततेत मुतारी बनाव आंदोलन केले होते. मात्र त्याकाळात जमावबंदीचे आदेश असल्याने, पवई पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांवर कारवाई केली होती. १६ आंदोलकांवर सोमवारी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र एवढे सगळे घडूनही मुतारीचा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे. लोकप्रतिनिधींनी मुतारी नववर्षाच्या सुरुवातीला सुरु होण्याचे आश्वासन दिले असले तरी, स्थानिक मात्र मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहेत.

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर (जुना आदि शंकराचार्य मार्ग) पवई उद्यान ते गांधीनगर या पवईमधील भागात सार्वजनिक मुतारी नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिला वर्गासाठी ही न सांगता येणारी मोठी अडचण बनली आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासन लक्ष घालत नसल्याने अखेर नागरिक व सर्वपक्षित कार्यकर्त्यांनी मिळून मुतारी बनाव आंदोलन केले होते. त्याकाळात जमावबंदी चालू असल्याने पोलिसांनी आंदोलकांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली होती.

मार्च २०१५ रोजी करण्यात आलेले जनआंदोलन

मार्च २०१५ रोजी करण्यात आलेले जनआंदोलन

सोमवारी पवई पोलिसांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आंदोलक वीरेंद्र धिवार, अमोल चव्हाण, भाऊ पंडागळे, विजय कुरकुटे, विनोद लिपचा, रत्ना कांबळे, उषा जगताप, सुभद्रा गायकवाड, चंदा खेडकर, अमरदीप आठवले, सचिन गाडे, सचिन पात्रे, राजू प्रधान, नंदकिशोर चव्हाण, कुणाल इनकर, दादा कांबळे यांच्या विरोधात कलम ३७ (३) सह १३५ मुंबई पोलीस कायदा अंतर्गत दोषारोपपत्र सादर केले. यामुळे जनता अजूनच क्रोधीत झाली असून, आंदोलन झाली, शिक्षा झाली आणि आता कोर्ट कचेरी सुद्धा सुरु झाली, पण ज्याच्यासाठी हे सगळे झाले ती मुतारी नाही झाली, ती कधी बनणार? असा संतप्त सवाल आता स्थानिकांकडून केला जात आहे.

या आंदोलनानंतर मंजुरीचे पोस्टर्स आणि संदेश पवईकरांच्यात फिरवले गेले, मात्र प्रत्यक्षात काहीच नाही घडले. 4 महिन्यानंतर लोकप्रतिनिधींच्या कार्यालयातून पत्रक काढून आमची घोर फसवणूक झाली आहे असे म्हणत पवईकर पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात असतानाच जुलै महिन्यात नगरसेवक चंदन चित्तरंजन शर्मा यांच्या प्रयत्नातून आयआयटी मेन गेट, आयआयटी मार्केट गेट आणि विसर्जन घाट या तीन वेगवेगळ्या ठिकाणी कंटेनर पध्दतीचे शौचालय मंजूर करण्यात आले असल्याचे फलक परिसरात झळकले आणि काही दिवसातच एक कंटेनर शौचालय पवई तलाव भागात आणून ठेवण्यात आले सुद्धा, मात्र ते शौचालय आजतागायत सुरु न झाल्याने लोकप्रतिनिधींनी पुन्हा फसवणूक केल्याने जनता क्रोधीत झाली आहे.

याबाबत स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले, “पूर्वी देण्यात आलेल्या जागेवर घाणपाणी वाहून नेण्याची सुविधा जोडणे मुश्कील होत असल्याने, नवीन जागा मंजुरीसाठी वेळ गेला. आता जागा मंजुरीचे सर्व सोपस्कार पूर्ण होत आले असून, येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून शौचालय जनतेसाठी खुले करण्यात येईल.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!