विजय विहार रोडला उजाळी; आमदार फंडातून रोड दुरुस्तीचे काम


वई येथील विजय विहार रोड जो गेली ७ वर्षापासून खितपत पडला होता त्याच्या दुरुस्तीचे काम नुकतेच सुरु झाले आहे. आमदार आरिफ नसिम खान यांच्या फंडातून रोड दुरुस्तीचे काम केले जात असून, पावसाळ्यापूर्वी रोडचे काम पूर्ण होणार असल्याचे याच्या ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे.

पवई विहार आणि लेक होम या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी हिरानंदानी व जेव्हीएलआरकडून जलवायू विहार मार्गे विजय विहार असा एकमेव प्रवेश रस्ता आहे. येथील भागात विकासकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या विकासकांच्यामधील अंतर्गत वादामुळे येथील रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुद्धा लटकले होते. या रस्त्यावरून प्रवास करताना पवईकरांना एखाद्या परग्रहावर पोहचल्यासारखे भासत होते. गेल्या ७ ते ८ वर्षापासून स्थानिक याच्या निर्मितीसाठी स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा सुद्धा करत होते, मात्र कोर्टात येथील मालकी हक्काला घेवून असणाऱ्या वादाचा दाखला देत रोडच्या निर्मितीचे काम प्रशासनाने रखडवून ठेवले होते.

गेल्या आठवड्यात स्थानिक आमदारांनी या परिसराला भेट देवून पाहणी करताना या परिसराची सगळ्यात मोठी समस्या असणाऱ्या या रोडच्या दुरुस्तीचे काम करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करताना कोर्टाकडून विशेष संमती मिळवत आमदार फंडातून या रोडच्या दुरुस्तीचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे.

या दुरुस्तीच्या कामामुळे केवळ पवई विहार, विजय विहार आणि लेकहोम येथील नागरिकांमध्येच नव्हे तर चांदिवलीतून हिरानंदानी आणि हिरानंदानीकडून चांदिवलीकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे. मात्र त्यांचा हा आनंद दीर्घकाळ टिकणार कि नेहमीप्रमाणे २ पावसातच रस्ता धुवून जाणार आणि लोकांच्या आनंदावर विरजण पडणार याची चिंता स्थानिकांना सतावत आहे.​

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!