व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटणाऱ्या दोघांना अटक

kidnappedसा किनाका येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून, त्यास बेदम चोप देऊन, लुटून पसार झालेल्या २ चोरट्यांना पकडण्यात बीकेसी पोलिसांना यश आले आहे. अपहरण आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहेत.

साकिनाका येथील कपडे व्यापारी राजकरन यादव यांचे अपहरण करून, त्यांना निर्जन स्थळी घेऊन जावून चोप देऊन, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन पळवून घेऊन गेलेल्या दोन आरोपींना बीकेसी पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी अटक केली आहे. अल्ताफ खान आणि याशुदास म्हेत्रे असे अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी चोरट्यांनी व्यापाऱ्याकडून लुटून नेलेली चैन त्यांच्याकडून हस्तगत केली आहे.

यादव हे साकिनाका परिसरात राहत असून, त्यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. सोमवारी टेम्पोमधून कपडे घेऊन ते काळबादेवी येथून माहीम येथे निघाले होते. माहीम रेल्वेस्थानक समोरील सिटीपार्क इमारती समोरून जात असताना अटक आरोपितांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांनी यादव यांना बीकेसी येथे आणून पैशांची मागणी केली, परंतु पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन घेऊन चोरट्यांनी पळ काढला.

चोर पळून जाताच यादव यांनी मुंबई पोलीस कंट्रोलरूमला घडलेल्या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बीकेसी पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करत दोन्ही आरोपींना मोटरसायकलवरून जात असताना अटक करण्यात केली. त्यांच्याविरोधात अपहरण आणि जबरी चोरीचा गुन्हा नोंद करून दोन्ही आरोपींना कोठडीची हवा दाखवली आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!