शॉर्ट सर्किटमुळे इंदिरानगरमध्ये आग, जीवितहानी नाही

स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळला मोठा धोका

 

fireरविवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान इंदिरानगर येथील चाळीत असलेल्या इलेक्ट्रिक मिटर बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अर्ध झोपेत असणाऱ्या लोकांना आगीची माहिती मिळताच स्थानिकांची धावपळ उडाली, मात्र दक्ष नागरिक व पोलीस यांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेत पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा धोका टळला.

पवई आयआयटी येथे मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळीचे जाळे आहे. यापैकी इंदिरानगर येथील आम्रपाली बुद्धविहार समोरील बैठ्या चाळीतील घरात वीजपुरवठा करणाऱ्या इलेक्ट्रिक मिटर बॉक्सला रविवारी रात्री १२ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अनेक कुटुंबे यावेळेस अर्ध झोपेत असल्याने, परिसरात आगीची बोंबाबोंब होताच सगळ्यांची एकच धावपळ उडाली. मात्र सतर्कता राखत काही स्थानिकांनी रेतीचा मारा करत आगीला पसरण्यापासून थोपवून धरले.

या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच, पवई पोलीस स्टेशनच्या बीट मार्शलने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने विजेचा पुरवठा खंडित केला. काही वेळातच विक्रोळी अग्निशमन दलाने येऊन स्थानिकांनी थोपवून ठेवलेल्या आगीवर पुर्णतः नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत १९ मीटर आणि बॉक्स वायरीसह पूर्णपणे जळून खाक झाले होते.

घटनास्थळी दाखल झालेल्या व वीजपुरवठा करणाऱ्या रिलाईन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून येथील काही मिटर हे अनधिकृतरित्या जोडण्या केलेले असल्याने शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असल्याचे स्पष्ट केले. येथील अनधिकृत मिटरची संपूर्ण पाहणी आणि चौकशी करून स्थानिक पोलीस स्टेशनला रिलाईन्स कंपनीतर्फे तक्रार नोंदवणार असल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!